शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच रक्षाबंधनात गुंफले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 21:24 IST

भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले.

ठळक मुद्दे मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान

बारामती : मागील महिन्यात काही समाजकंटकांनी केलेल्या हल्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी उद्योगांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: चाकण परिसरात त्याची अधिक झळ पोहचली. त्यामुळे धास्तावलेल्या जिल्ह्यातील उद्योजकांनी सुरक्षिततेसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच राखी बांधून रक्षाबंधनाच्या अनोख्या बंधात गुंफले. भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या बंधनाशी बांधिलकी जपत उद्योजकांचे सुरक्षिततेसह विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची झुम ही  औद्योगिक संघटना आहे. या संघटनेचे जिल्हाधिकारी स्वत: अध्यक्ष आहेत. प्रत्येक दोन, तीन महिन्यामधून एकदा संघटनेची बैठक होते. काही दिवसांपुर्वी संघटनेची बैठक पार पडली. यासाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी रमेश  काळे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी संजीव देशमुख आदी उपस्थित होते. एमआयडीसीतील रस्ता, खड्डे, जागा, पोलीस स्टेशन, रुग्णालय, आरोग्य योजना आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुणे जिल्हा औद्योगिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, कोषाध्यक्ष प्रदीप सपकाळ, बारामती चेंंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, फेडरेशन आॅफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनोद जैन आदींनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली.औरंगाबाद, चाकण येथे मागील महिन्यात आंदोलनाच्या वेळी काही समाजकंटकांनी हल्ले केले. त्यामध्ये उद्योगांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे उद्योग विश्वात अद्याप भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भाऊ म्हणून पाठराखे बनून उद्योगांचे, आमचे संरक्षण करा असे साकडे घालण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या नात्याची जाण ठेवत चाकण एमआयडीसीत भेट देउन तेथे  बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तेथील पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असून जागेच्या प्रश्नासह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.दरम्यान, बारामती येथील एमआयडीसीमध्ये अनेक ठीकाणी बीएसएनएलची ह्यलॅण्डलाईनह्य अनेक ठिकाणी पोहचलेली नाही. केबल अभावी ही सेवा अद्याप अनेक उद्योगांना मिळालेली नाही. त्यामुळे इंटरनेटची सेवा मिळण्यास अडचणी येतात. उद्योगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी समस्या या बैठकीत मांडल्याचे कुंभार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. पुढील बैठकीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना सांगून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अतिरीक्त जिल्हाधिकारी काळे यांनी दिल्याचे कुंभार म्हणाले.

टॅग्स :Chakanचाकणbusinessव्यवसायMIDCएमआयडीसीNavalkishor Ramनवलकिशोर रामRaksha Bandhanरक्षाबंधन