शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर लोकसभा मतदानाची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण : २ हजार २९६ मतदान केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 12:27 IST

महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देचौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिल रोजी होणार शिरूर लोकसभा मतदार संघातील एकूण २१ लाख ७३ हजार ५२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली आहे. या मतदार संघात २ हजार २९६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तसेच पुणे व बारामती मतदार संघाप्रमाणे शिरूर लोकसभा मतदार संघातील २३७ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी व शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी गुरूवारी सांगितले. महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूका पार पडत असून तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिल रोजी होणार असून त्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर व मावळ लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील एकूण २१ लाख ७३ हजार ५२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदार संघात एकूण १२ हजार ६८५ कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे ७० टक्के मतदारांपर्यंत मतदानासाठी स्लिपांचे वाटप केले आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे ६९ मतदान केंद्र वाढली आहेत. त्यातील ३५ हडपसरमध्ये २० भोसरीत,१२ शिरूरमध्ये तर २ आळंदी परिसरात आहेत. या मतदार संघात ११६ वाहनांना परवाना दिले असून २०६ कोपरा सभांना मंजूरी दिली.जिल्हा प्रशासनातर्फे मतदानाच्या दृष्टीने आवश्यक तयारी पूर्ण केली असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचाºयांना मतदानासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास बंदी आहे. काही मतदारांकडून मतदान प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग होतो. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेवून येऊ नये, सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रमेश काळे यांनी केले आहे.निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांपैकी २ हजार ४५ सैनिक मतदारांना आॅनलाईन बॅलेट पेपर पाठविले आहेत. तर ८५४ मतदार पोस्टल मतदान करणार आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ४०८ कर्मचाºयांची नियुक्ती त्यांच्याच विधानसभा मतदार संघात झाली आहे. त्यामुळे  ईडीएफचा वापर करून हे कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करणार आहेत. आत्तापर्यंत २९ लाख ६७ लाख ११६ रोख रक्कम आणि ९ हजार ३३३ लिटर मद्य जप्त केले आहे, असेही काळे म्हणाले.

टॅग्स :Shirurशिरुरshirur-pcशिरूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणVotingमतदान