शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजनेच्या माहितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पुणे शहरातील कुष्ठरुग्णांसाठी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:23 IST

जिल्हा प्रशासनाच्यावतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता कमला नेहरु रुग्णालयात कुष्ठरुग्णांसाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी तहसीलदार अर्चना यादव यांनी मार्गदर्शन केले.  

ठळक मुद्देयोजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हाती घेतली विशेष मोहिम ७० कुष्ठरुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता कमला नेहरु रुग्णालयात कुष्ठरुग्णांसाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी तहसीलदार अर्चना यादव यांनी मार्गदर्शन केले.    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मोहिमेंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थी वंचित राहू नये व या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत कुष्ठरोग्यांनाही पेन्शन दिली जाते. मात्र या योजनेबाबत माहिती नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. यावेळी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, वयस्कर महिलांसाठीच्या श्रावणबाळ योजनेसह विविध योजनांचीही माहिती देण्यात आली. या शिबिराचा लाभ ७० कुष्ठरुग्णांनी घेतला. वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक पुणे तसेच आरोग्यसेवा सहायक संचालक यांच्या सहकार्याने संजय गांधी निराधार योजना (पुणे शहर) यांच्या समन्वयाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रुग्णांना उत्पन्नाचे दाखले, रहिवास दाखले आणि प्रतिज्ञापत्रांचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी कुष्ठरोगी असल्याचे प्रमाणपत्र दिले गेले. पेन्शन योजनेसाठी पात्र असल्याचे अर्ज भरुन घेण्यात आल्याची माहिती यादव यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेSaurabh Raoसौरभ राव