पुणे : श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणेचे अध्यक्ष शामराव वीर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वीर कुटूंबींयाच्यावतीने वाघोलीतील लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्थेतील ४० जणांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्याबरोबर ३५० जणांना तांब्याच्या जारचे वाटप, अन्नदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप झाले. याप्रसंगी श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष नाना पगडे, विजय मेथे, संजय पवळे, अखिल पुणे पुâलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर, वैजनाथ म्हेत्रे, दत्तात्रय कड, बॉबी शिंदे, सचिन महाडीक आदी उपस्थित होते.
अंध- अपंगांना ब्लँकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:26 IST