पुणे: राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एससी संवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असून राज्यातील केवळ १३.१७ टक्के विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली. राज्यातील १ लाख १ हजार ९१४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण विभागाकडून अद्याप मंजूर झाले नाहीत. तसेच १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी मंजूर केलेले नाहीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.समाज कल्याण विभागातर्फे महाटीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारले जात असून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज शिक्षण संस्थेकडून मंजूर झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडे पाठविला जातो. परंतु, एससी संवर्गातील शिष्यवृत्ती व फ्री शीपसाठी केलेले अर्ज समाज कल्याण विभागाकडे पडून आहेत.विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली.त्यामुळे विद्यार्थी संख्येतही वाढ होत आहेत.मात्र, डीबीटी पोर्टलचा वापर करून सुध्दा विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.समाज कल्याण विभागाकडे १८ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील एससी संवर्गातील ३ लाख ९५ हजार १६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्री शीपसाठी अर्ज केले. मात्र,त्यातील ३७ हजार ५१२ अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे पात्र अर्जांपैकी ३ लाख ४० हजार ६५० विद्यार्थांचे अर्ज शिक्षण संस्थांनी आणि समाज कल्याण विभागाने मंजूर केले आहेत. त्यात पुणे विभागातील ६५,४९२ नाशिक विभागातील २४ ,७०८ नागपूर विभागातील ३१,८५७ मुंबई विभागातील १७,०९५ लातूर विभागातील २४,९०४ औरंगाबाद विभागातील ३१,६०९ अमरावती विभागातील ३७,९८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर जमा व्हावी,अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.------------------ राज्याची विभागानिहाय शिष्यवृत्ती व फ्री शीप अर्जाची माहिती विभागाचे नाव नोंदणी अर्ज संख्या शिक्षण संस्थांकडून अर्ज मंजूर विद्यार्थ्यांची वितरीत केलेली शिष्यवृत्ती पुणे ७९,३५९ ३६,१०३ ४.०७ टक्के नाशिक ५१,७६३ २०,६२१ १.७३नागपूर ७५,२७३ ३३,६१६ ४.२९मुंबई ३५,५८८ ११,६६३ १.४४लातूर ४१,८१७ १२,२९३ ०.८२औरंगाबाद ५८,६०२ १९,०२२ ०.५५अमरावती ५२,७५८ ९,७८२ ०.२८--------------------------------------------------------
समाज कल्याणकडून १३ टक्के शिष्यवृत्तीचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 07:00 IST