शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

डीसकेंच्या मेहुणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:07 IST

डीएसके यांची मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय ६१, रा. धनकवडी, पुणे) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक

पुणे : डीएसके यांची मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय ६१, रा. धनकवडी, पुणे) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून सोमवारी विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुरंदरे या डीएसकेंच्या पत्नी हेंमती कुलकर्णी हिच्यासोबत कंपनीत भागीदार असल्याचे व गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ४५ हजार जणांची एक हजार ८३ कोटींची फसवणूक करण्यात आली असून फसवणुकीचा एकूण आकडा दोन हजार ४३ कोटींपर्यंतचा आहे. डीएसके यांच्या भावाचा जावई केदार वांजपे त्याची पत्नी सई वांजपे, डीएसके समूहाचा सीईओ धनंजय पाचपोर, आर्थिक विभागाचा प्रमुख विनयकुमार बडगंडे यांनाही आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर, डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याने मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.पुरंदरे या हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत वेगवेगळ््या कंपनीत कार्यरत होत्या. डी. एस. कुलकर्णी अ‍ॅन्ड कंपनीचे सुद्धा सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्याकडे होते त्यामुळे सॉफ्टवेअरचा पासवर्ड केवळ त्यांच्याकडे आहे. २०१० ते २०१७ यादरम्यान शिरीष कुलकर्णी यांनी स्वीकारलेल्या ठेवीतून एकूण १५४ कोटी वर्ग करण्यात आले. याच काळात डीएसके यांच्या खात्यावरुन एकूण ९०. ९४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत, तर इतर सिस्टर कन्सर्न कंपन्यांना सदर कालावधीत एकूण २४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून त्याबाबत तपास करायचा असल्याने पुरंदरेच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली.