शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

मृतदेहाची चिरफाड करायला वाघाचं काळीज लागतं भावा; भेटा, ५ हजार शवविच्छेदनं केलेल्या डॉक्टरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 09:16 IST

कोणतीही भिती न बाळगता मागील १४ शवविच्छेदनाचे काम...

तेजस टवलारकर पिंपरी :शवविच्छेदनगृह पाहिले तरी अनेकांना भिती वाटते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे म्हटले तरी अनेक जण भिती पोटी मृतदेहाला हात लावत नाहीत. तसेच शवविच्छेदनगृहापर्यंत मृतदेहाला घेऊन जाण्यासाठी ही अनेक जण तयार होत नाहीत. परंतु कोणतीही भिती न बाळगता मागील १४ वर्षांपासून डॉ. प्रविण कानडे शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनाचे काम करीत आहेत.

सद्यस्थितीत डॉ. कानडे पुण्यातील बी. जे. शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत आहे. त्यांनी आतापर्यंत विविध शासकीय रूग्णालयात काम केले आहे. तळेगाव येथील कार्यरत असताना पुणे-मुबंई महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या अनेकांचे त्यांनी शवविच्छेदन केले आहे. 

आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर २०१४ मध्ये कोसळलेल्या दरडीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशच हादरला होता. रात्रीपासून कोसळणारा पाऊस कधी थांबतोय, याची वाट पाहत बसलेले गाव एकाएकी डोंगरावरून आलेल्या चिखलाच्या प्रचंड लोंढ्यात गाडले गेले होते. चिखलात गाडल्या गेल्याने मृतदेहांची दुर्रावस्था झाली होती. माळीणच्या घटनेत मृत्यू झालेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन देखील डॉ. कानडे यांनी केले होते. ही घटना कधीही विसरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

५ हजार मृतदेहांचे केले शवविच्छेदन डॉ. कानडे यांनी  आता पर्यंत जवळपास ५ हजार मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे. सद्यस्थितीत ते शवविच्छेदन या विषयावर एम. डी. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी सुरूवातीपासूनच शासकीय रूग्णालयात काम केले आहे. 

पहिला अनुभव कसा होता?

एमबीबीएसचे नुकतेच शिक्षण पूर्ण करून डॉ. कानडे सातारा येथील शासकीय रूग्णालयात नोकरीला लागले होते. ही गोष्ट २००८ ची आहे. नदीत वाहून आलेल्या मृतदेहांचे त्यांनी शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदन करण्याची ही त्यांची पहिली वेळ होती. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे इतरांचा सल्ला घेणे शक्य नव्हते. अशा वेळी स्वत: अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. पहिल्यांदा केले शवविच्छेदन कधी विसरू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

शवविच्छेदन शिकले कोठे?

डॉ. कानडे यांनी एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केले आहे. येथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शवविच्छेदन कसे करायचे याचे शिक्षण घेतले.

प्रत्येक अववय वेगळा करावा लागतो

शवविच्छेदन करताना अववय शरीरातून काढावे लागतात. ज्या ठिकाणी संशय आला वा काही अववय डोळ्यांनी दिसत नसतील तर अशा वेळी मायक्रोस्कोपची मदत घ्यावी लागते. शरीरातून काढलेल्या अववयांची तपासणी करावी लागले. तपासणी केल्यावर मृत्यू कशामुळे झाला याचे निदान होते.

मृतदेहाला न्याय मिळवून देण्याचे काम करावे लागते. शवविच्छेदन करणे हे डॉक्टर म्हणून कर्तव्य आहे. त्यामुळे भिती वाटत नाही. कठीण प्रसंगाच्या वेळी स्वत: निर्णय घ्यावे लागतात.

 -डॉ. प्रविण कानडे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल