शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रशासकीय खर्चानेच मोडले कंबरडे; आता नवीन आराखड्यानुसार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 04:17 IST

प्रशासकीय कामकाजावरील सर्वसाधारण खर्च एकूण खर्चाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा शासन निर्णय आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये काही वर्षांपासून याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मागील आर्थिक वर्षात हा खर्च ५० टक्क्यांच्याही पुढे गेला होता.

पुणे : प्रशासकीय कामकाजावरील सर्वसाधारण खर्च एकूण खर्चाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा शासन निर्णय आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये काही वर्षांपासून याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मागील आर्थिक वर्षात हा खर्च ५० टक्क्यांच्याही पुढे गेला होता. या अतिरिक्त प्रशासकीय खर्चामुळे पीएमपीचे कंबरडे मोडले आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी नवीन आस्थापना आराखडा तयार केला असून, त्यानुसार कामकाजालाही सुरुवात केली आहे.‘पीएमपी’ची निर्मिती झाल्यानंतर आतापर्यंत आस्थापना आराखडाच तयार करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मागील दहा वर्षांत पदोन्नती, भरती, कर्मचारी संख्या याबाबत कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. शैक्षणिक अर्हता, अनुभव विचार न घेता अनेकांना पदोन्नती देण्यात आली. बसची संख्या व एकूण कर्मचाºयांची संख्या याचा ताळमेळ घालण्यात आला नाही. त्यामुळे वर्षागणिक पीएमपीवरील प्रशासकीय खर्चाचा बोजा वाढत गेला. आर्थिक वर्ष २००९-१० मध्ये पीएमपीकडे १० हजार २३६ सेवक होते. त्यासाठी सुमारे १९२ कोटी २५ लाख रुपये खर्च आला होता. हा खर्च एकूण खर्चाच्या ४५ टक्के तर प्रतिसेवक प्रतिदिन ३५८ रुपये होता. त्यानंतर २०१०-११मध्ये कर्मचारी संख्येत अडीचशेने घट झाल्याने खर्चाचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत खाली आले. पण २०११-१२मध्ये ९ हजार ५८९ कर्मचाºयांसाठी २०९ कोटी ५० लाख रुपये खर्ची पडले. त्यानंतर सातत्याने खर्चाचा हा बोजा वाढत गेला. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये ९ हजार ७४३ सेवकांसाठी ५१६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा खर्च प्रतिदिन प्रति सेवक ९४२ रुपये म्हणजे एकूण खर्चाच्या तब्बल ५५.८५ टक्के एवढा आहे. प्रशासकीय खर्च कमी करण्याबाबत आतापर्यंत काहीच प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यातच कर्मचाºयांच्या नियुक्त्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने ‘पीएमपी’ सेवेव्यतिरिक्त पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतही अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे काम करीत होते. आस्थापना आराखडा नसल्याने वेतनश्रेणी, पदोन्नतीबाबत स्पष्टता नव्हती. मुंढे यांनी नव्याने आस्थापना आराखडा तयार केला असून त्यानुसार प्रशासकीय खर्चात कपात होणार आहे.मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९-१० मध्ये १० हजार २३६ कर्मचारी असताना बसचे संचलन सुमारे ११ कोटी १६ लाख किलोमीटर होते. तर २०१६-१७मध्ये कर्मचारी संख्या घटून ९७४३ झाली. त्यानंतरही संचलन कमी झालेले दिसत नाही. प्रतिकिलोमीटर खर्चातही सध्या मोठी वाढ झाली आहे. हा खर्च अनुक्रमे १७.८४ रुपयांवरून ४६.२२ रुपयांवर पोहोचला आहे.खासगी बस ठेकेदार घेतल्यामुळे खर्चात वाढ झाली. सीआयआरटीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार, प्रतिबस ८.४५ सेवक दाखविण्यात आले होते. त्याचा प्रतिमहिना खर्च सुमारे ३१ कोटी होतो. नवीन तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार प्रतिबस केवळ ५.९२ कर्मचारीलागणार आहे. त्यामुळे सुमारे २० कोटी २७ लाख रुपयांचा खर्च वाचेल.नवीन आराखडा तयार करण्याबरोबच बेकायदेशीर पदोन्नत्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना शैक्षणिक गुणवत्ता व पदापेक्षा तिप्पट वेतन दिले जात होते. पूर्वी पीएमपीचे तीन विभाग होते, आता ते चार करण्यात आले असून, त्यामुळे खर्च कमी होणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सेवकांमध्ये बसचे संचलन वाढण्याबरोबरच तोटाही कमी होऊ लागला आहे. पूर्वी कामाचे नियोजन व आराखडा नसल्याने खर्चाचा बोजा वाढला आहे. आता नवीन आराखड्यानुसारच काम चालेल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.वर्षाला २०० कोटी तूटपीएमटी होती त्या वेळी पुणे महानगरपालिकेला त्यांनावर्षाकाठी फक्त २ कोटी रुपये व तेही कर्मचाºयांच्या बोनससाठी म्हणूनच द्यावे लागत होते. पीएमपी स्थापन झाली आहे, तर आता वर्षाला २०० कोटी रुपये (संचलन तूट व पासमधील सवलत मिळून) द्यावे लागत आहेत. दरवर्षी महानगरपालिका त्यांना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे देत आहे. असे आतापर्यंत एकूण ९९० कोटी रुपये देण्यात आले आहे. असे असताना तोटा कमी व्हावा, अशी अपेक्षा महानगरपालिकेने बाळगली, त्यासाठी काही उपाय सुचवले, तर त्याची अंमलबजावणी करणे हे तुकाराम मुंढे यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रथम कामच आहे. पीएमपी स्थापन झाली सन २००७ मध्ये! तेव्हापासून ते आतापर्यंत महानगरपालिकेने या संस्थेला ९९० कोटी रुपये अदा केले आहेत. सुरुवातीची फक्त तीन वर्षे पैसे द्यावेत असे ठरले होते.- आबा बागुल,ज्येष्ठ नगरसेवक, पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणे