शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिकेतले भांडण मिटले :महापौरांची मध्यस्थी यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 18:46 IST

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. 

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. 

          २१ मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असतानाच भिमाले व शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यात भिमाले यांनी शिंदेंना उद्देशून अनेक अशिष्ट शब्द वापरले. त्यावरून शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी भिमाले यांच्या विरोधात पोलिसात फिर्यांद दिली  त्यानंतर 25 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला. त्याची दखल घेत भिमाले यांनीही शिंदे यांना वकिलामार्फत 101 कोटी रूपयांचा दावा दाखल करणार असल्याची नोटीस बजावली होती.या गटनेत्यांच्या भांडणाची चर्चा शहरासह राज्यातही रंगली होती. या प्रकारामुळे महापालिकेची प्रतिष्ठा कमी झाल्याचे मतही काही ज्येष्ठ नगरसेवकांनी खासगीत नोंदवले होते. अखेर आज हे भांडण मिटल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला.  

           आज दुपारी झालेल्या सर्वसाधारणसभेच्या सुरूवातीलाच महापौरांनी सदस्यांनी सभागृहाची तिष्ठा सदस्यांनी कायम ठेवावी असे आवाहन  केले. त्याला शिंदे व भिमाले यांनी प्रतिसाद दिला.यावेळी शिंदे म्हणाले की, चुकीची माफी मागायला जास्त धेर्य लागतं, ते आमच्याकडे आहे. भिमाले यांनीही सभेच्या कामकाजातून ते वक्तव्ये काढून टाकावे असे सांगितले आणि संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेले भांडण मिटल्याचे स्पष्ट झाले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारणMukta Tilakमुक्ता टिळक