महाश्रमदानात १० लाख टन कचऱ्याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:12+5:302021-09-18T04:13:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुठलेही काम समूहाने केले की ते यशस्वी होते. जिल्ह्यात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत ...

Disposal of 1 million tons of waste in Mahashram donation | महाश्रमदानात १० लाख टन कचऱ्याची विल्हेवाट

महाश्रमदानात १० लाख टन कचऱ्याची विल्हेवाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कुठलेही काम समूहाने केले की ते यशस्वी होते. जिल्ह्यात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महाेत्सवाचे औचित्याने गुरुवारी १ हजार ३८८ ग्रामपंचायतींत महास्वच्छता अभियानात नागरिकांनी महाश्रमदान करत तब्बल १० लाख २४ हजार १९८ टन कचऱ्याची विल्हेवाट लावत विक्रम केला. जिल्ह्यात कचरामुक्तीसाठी घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. गावे स्वच्छ व्हावीत आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सहभागी होत आपल्या गावांत स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत तब्बल १० लाख २४ हजार१९८ टन कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेत ग्रामस्थांपासून, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदारांनीही सहभाग घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. जिल्ह्यातील राज्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, खातेप्रमुख गटविकास अधिकारी, खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, गावस्तरीय कर्मचारी ग्रामस्थ, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचतगटांनी सहभाग घेतला.

चौकट

एकूण १ लाख ३७ हजार ३२५ नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. यात ४३ हजार ८५२ महिला तर ९३ हजार ४७३ पुरुषांनी सहभाग घेत १० लाख २४ हजार १९८ कचरा संकलित केला. या मोहिमेत ६ लाख २२ हजार ५६९ टन सुका कचरा तर ३ लाख ६२ हजार ४१३ ओला कचरा गोळा करण्यात आला. तर३९ हजार २१६ किलो प्लास्टिक चकरा गोळा करण्यात आला. कचरा संकलित करण्यासाठी २ हजार २४० वाहने वापरण्यात आली. यात ६४७ ट्रॅक्टर, ८४४ घंटागाड्या, ३२ जेसीबी, ४१८ टेम्पो तर२९९ इतर वाहनांचा समावेश आहे.

चौकट

या महा श्रमदान स्वच्छता दिनाकरिता जलशक्ती मंत्रालय भारत सरकार कडून जुनेद उस्मानी व सुचिता देव सहभागी झाले. त्यांनी देखील जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रमांचे तसेच महाश्रमदान स्वच्छता कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी केद्र शासनाचे अधिकारी यांनी जिल्ह्यात राबविलेले उपक्रम देशात राबविणेबाबत भारत सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

चौकट

महाश्रमदान स्वच्छता दिनाची उत्तम प्रकारे जनजागृती झाली. स्वच्छता श्रमदान बाबतचे तसेच स्वच्छताविषयक माहितीचे पोस्टर, बॅनर, भिंती रंगकाम गावानी स्वयंस्फूर्तीने तयार केले. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

महाश्रमदान स्वच्छतादिनी जिल्ह्यातील गावांमध्ये कचरा व्यवस्थापन, स्वच्छताविषयक कामाचे शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम घेतले, तसेच वृक्ष लागवड करण्यात आली.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

Web Title: Disposal of 1 million tons of waste in Mahashram donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.