शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सणसवाडीत कामगारांना दह्यातून विषबाधा

By admin | Updated: March 14, 2016 01:21 IST

सणसवाडी (ता. शिरूर) येथील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यातील कामगारांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने १५ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यातील कामगारांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने १५ कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील आरएसबी ट्रान्समिशन या कारखान्यात ५६० कामगार काम करीत आहेत. कारखान्यात श्री एंटरप्रायझेसमार्फत कामगारांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आहे. शनिवारी सकाळच्या पाळीमध्ये कामगारांना दुपारी जेवणामध्ये दही देण्यात आले होते. या दह्यामधून कामगारांना विषबाधा होऊन शनिवारी सायंकाळपासून उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. कामगारांनी रात्री गोळ्या घेतल्या; परंतु आजही उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ७० कामगारांची तपासणी करुन औषधोपचार केला. यातील जास्त बाधित असणाऱ्या १५ कामगारांवर उपचार सुरू आहेत. सकाळपासूनच रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर कामगारांची गर्दी दिसल्यानंतर रुग्णालयात बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. डॉ. विशाल व्यवहारे यांनी सर्वांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगितले. दरम्यान, कारखान्याचे प्रकल्पप्रमुख दत्ता दास यांनी सांगितले की, ‘कारखान्याने या प्रकारातून खबरदारी घेत सर्व कामगारांची प्राथमिक तपासणी रुग्णालयात करून घेतली आहे. त्यांना प्रथमोपचार म्हणून औषधेही कारखान्यामार्फत दिली आहेत व कारखान्यामार्फत कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही करण्यात येते. भविष्यात कामगारांच्या आरोग्याची अधिक प्रभावीपणे काळजी घेतली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)