शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व्यवस्थेतील आव्हानांवर पुण्यात रंगणार चर्चासत्र; विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:51 IST

‘शिक्षण व्यवस्थेतील वाढते धोके’ या विषयावर  येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात राज्यस्तरीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देशनिवार दि. १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता संमेलनाला सुरवातविचारवेध असोसिएशन आणि एस. एस. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने आयोजन

पुणे : ‘शिक्षण व्यवस्थेतील वाढते धोके’ या विषयावर  येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात राज्यस्तरीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. विचारवेध असोसिएशन आणि एस. एस. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने  हे दोन दिवसीय संमेलन नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात संपन्न होणार आहे. शनिवार दि. १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता संमेलनाला सुरवात होईल. पहिल्या सत्रात ‘शिक्षणातील सांप्रदायिकरण’ या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्रा. डॉ. अपूर्वानंद झा, प्रा. जयदेव डोळे आणि कर्नाटकातील  हंपी विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुरेश भट हे शिक्षणतज्ज्ञ सहभागी होतील. सरिता आवाड या विचारवेधची भूमिका मांडतील. तर प्रा. ओमप्रकाश मलमे हे विचारवेध संमेलनाची भूमिका मांडतील.त्यानंतर ‘शिक्षण क्षेत्रातील संघर्षात्मक काम करताना भिडलेले वास्तव व येणाऱ्या समस्या’या सत्रात विद्यार्थी आंदोलनातील विद्यार्थी नेते दत्ता ढगे हे सादरीकरण करतील. तर डोंथा प्रशांत हे भूमिका विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील. दुपारच्या सत्रात ‘शिक्षणातील लिंगभाव’ याविषयावर सामाजिक कार्यकर्त्या निशा शिऊरकर आणि दिशा शेख या मांडणी करतील. त्यानंतर ‘वंचिताचे शिक्षण’ या विषयावर पद्मा वेलस्कर, प्रणित सिन्हा हे मांडणी करतील. संध्याकाळी ‘आजका समय और कविता’ या कवी संमेलनात गजानन परांजपे, अक्षय वाटवे, गणेश विसपुते हे सहभागी होतील. त्यानंतर ठाणे येथील समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीन ‘वंचितांच्या रंगमंचावरील नाटीका’ सादर करतील. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारीला सकाळी ‘शिक्षणाचे बाजारीकरण’ ह्या विषयावर जन्ध्याला टिळक, दिलीप चव्हाण, संजय दाभाडे हे आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ‘शिक्षण क्षेत्रातील संघर्षात्मक काम करताना भिडलेले वास्तव व येणाऱ्या समस्या’या सत्रात विद्यार्थी आंदोलनातील विद्यार्थी नेते प्रवीण खुंटे, अद्वैत दंडवते, प्रतिक वडमारे हे सहभागी होतील.   दुपारच्या सत्रात निबंध स्पर्धेतील निवडक निबंधाचे वाचन, व्हिडिओ सादरीकरण आणि खुले सत्र होईल. आनंद करंदीकर हे विचारवेधची पुढची दिशा स्पष्ट करतील. त्यानंतर चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, विभावरी देशपांडे हे ‘आज या देशामध्ये....हा कवितांचा कार्यक्रम सादर करतील. 

टॅग्स :Puneपुणे