शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सायकल शेअरिंगचे भवितव्य उद्या, महापालिका सर्वसाधारण सभा, आरोग्य उपविधीवरही चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:35 IST

स्मार्ट सिटी कंपनीची सायकल शेअरिंग योजना त्यांच्या विशेष क्षेत्रात सुरू झाली, आता संपूर्ण शहरातील सायकल शेअरिंग योजनेचे भवितव्य गुरुवारी (दि. १४) होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य उपविधीमध्ये केलेल्या नव्या नियमांवरही या वेळी चर्चा होणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीची सायकल शेअरिंग योजना त्यांच्या विशेष क्षेत्रात सुरू झाली, आता संपूर्ण शहरातील सायकल शेअरिंग योजनेचे भवितव्य गुरुवारी (दि. १४) होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आरोग्य उपविधीमध्ये केलेल्या नव्या नियमांवरही या वेळी चर्चा होणार आहे.महापालिका आयुक्त कुणाल कुमार शहरात सायकल शेअरिंग योजना राबवण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी खासगी सल्लागार कंपनीकडून याबाबतचा एक सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला आहे. त्यानुसार शहरात १ लाख सायकली घेण्यात येणार असून, त्यासाठी ५३१ किलोमीटरचे सायकल ट्रॅक शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्यातही बरेच वैविध्य असेल. काही हजार सायकल स्थानकेही असतील. भाडेतत्त्वावर सायकल मिळेल, नाममात्र शुल्क असेल. सायकल एका स्थानकावरून घेऊन दुसºया स्थानकावर जमा करता येईल, अशा अनेक गोष्टी या अहवालात आहेत. सर्व सायकली अत्याधुनिक असणार आहेत व त्यांच्या वापराला प्रोत्साहन मिळावे यासाठी योजनाही राबविण्यात येतील.दोन आठवड्यांपूर्वी या व आरोग्य उपविधीच्या योजनांना मंजुरी घेण्यासाठी म्हणून महापालिकेची विशेष सर्वसाधारण योजना आयोजित करण्यात आली होती. त्यात हे विषय मंजूर व्हावेत, अशी आयुक्तांची आग्रही भूमिका होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी ती मान्यही केली होती, मात्र सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व आयुक्त यांचे काही नगरसेवकांच्या कामांना मंजुरी देण्यावरून बिनसले व त्याचा परिणाम म्हणून ही विशेष सभा अवघ्या एका मिनिटात तहकूब करण्यात आली. आता ती १४ डिसेंबरला (गुरुवारी) दुपारी ३ वाजता होणार आहे.या दोन्ही विषयांचे काय करायचे, यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक बुधवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता महापौर निवासस्थानी होत आहे. सर्व नगरसेवकांना त्यासाठी बोलावण्यात आले आहे. पक्ष संघटनेचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित असतील. त्यात प्रशासनाच्या वतीने या दोन्ही विषयांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सदस्यांना ज्या शंका असतील, त्या त्यांनी प्रशासनाला विचाराव्यात, असे सांगण्यात आले आहे. सायकल शेअरिंग योजनेबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांना सकारात्मक विचार करण्यास सांगितले आहे.- आरोग्य उपविधीमध्ये कचरा इतस्तत: फेकल्यानंतर करायच्या दंडामध्ये वाढ, दुसºयांदा तोच गुन्हा केल्यावर त्यामध्ये वाढ व नंतर खटला दाखल करणे, असे काही नवे नियम करण्यात आले आहेत. याही विषयाचे सादरीकरण बुधवारच्या बैठकीत होईल, मात्र कचरा करणाºयांना वचक बसावा, यासाठी हा विषय आहे तसा मंजूर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणे