शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 14:47 IST

निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली...

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता

अमोल अवचिते- पुणे : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सरकारकडून तसेच प्रशासनाकडून कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सरकार नोकरभरती काढणार का? संबंधित विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी प्राप्त होऊन परीक्षा घेतल्या जाणार आहेत  का? आदी प्रश्नांवरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. सर्वसामान्यपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये विभागातील असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार लोकसेवा आयोगाला मागणीपत्र प्राप्त होते. त्यानुसार रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध होऊन परीक्षा घेतली जाते. डिसेंबर महिन्यात राज्यसेवा परीक्षेची जाहिरात येऊन फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात येते. मात्र राष्ट्रपती राजवटीमुळे ही परीक्षा घेतली जाणार का? नव्याने जागा निर्माण करून भरती प्रक्रिया राबविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्यपाल नोकरशाहीवर दबाव टाकून घेतील का? नियोजित वेळापत्रकानुसार होणाºया परीक्षा योग्य वातावरणात पार पडतील का? अशा विविध प्रश्नांनी उमेदवारांना काळजीत टाकले आहे. यामुळे एकूणच अभ्यासावर परिणाम होत असल्याचे उमेदवारांनी ‘लोकमत’ला सांगितले. निवडणुकीनंतर राज्याला स्थिर सरकार मिळेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. युतीचे सरकार तरी येईल, असे वाटले होते. स्वत:च्या अहंकारापायी, वडिलांना दिलेल्या शब्दामुळे तसेच बंद खोलीत झालेल्या चर्चेमुळे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे मतदान करणाºया तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचाच हा प्रकार आहे..........राज्यातल्या तरुणाईने मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्याला एक स्थिर सरकार येईल, अशी अपेक्षा होती. मात्र सत्तेच्या मोहापायी सर्वच पक्ष सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे तरुणाईचे होणारे नुकसान कोण भरून देणार? लाखो तरुण रोजागाराच्या प्रतीक्षेत असताना राज्यामध्ये स्थिर सरकार नसणे ही महाराष्ट्राची अराजकतेकडे होणारी वाटचाल आहे का, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहे. - अमोल हिप्परगे, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी विद्यार्थी संघटना............   राष्ट्रपती राजवटी दरम्यान महाशिवआघाडीचे सरकार जर स्थापन होऊ शकले नाही, तर पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा आचारसंहिता आणि निवडणुकांमध्ये किती कालावधी जाणार हा देखील गंभीर प्रश्न आहे. या सर्व सत्ता घोळाचा परिणाम निष्पाप, प्रामाणिकपणे स्वत:चे भविष्य घडविणाºया तरुणाईला भोगावा लागणार आहे.  - नीलेश निंबाळकर, उमेदवार.....अस्थिर राजकीय व्यवस्थेमुळे लागू झालेली राष्ट्रपती राजवट  ही तरुणाईच्या आशा-अपेक्षांचा भंग झाल्यासारखी आहे. वाढती बेरोजगारी आणि रिक्त जागांची पदभरती यांमुळे मोठा अडथळा या परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. याचा फटका ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया असंख्य विद्यार्थ्यांना बसत आहे. - संकेत ठाकरे ...........महाराष्ट्रात आधीच एकीकडे दुष्काळ अन् एकीकडे बेरोजगारी वाढत असताना, राजकारणी लोक राज्याला स्थिर सरकार देऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. आधीच्या सरकारने घोषित केलेल्या नोकरभरती पूर्ण होतील का नाही याची चिंता वाटत आहे. सरकार कोणी का स्थापन करू द्या पण बेरोजगार मुलांचे प्रश्न सोडवावेत हीच एक अपेक्षा आहे.- स्नेहा राऊत.........राष्ट्रपती राजवटीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांचे मागणीपत्र राज्यपालांनी नोकरशाहीवर दबाव टाकून मान्य करून घ्यावे. तसेच नियोजित परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात. - सचिन लेंढवे.................

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा