शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:25 AM

शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय.

पुणे : शहरातील रस्त्यांवर पहिल्यांदाच वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस धावू लागल्याने सगळ्यांनाच अपु्रप वाटत आहे. प्रवाशांकडूनही या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकदा गर्दी ओव्हरफ्लो होत आहे. सध्या केवळ सातच मार्गांवर बसचे संचलन सुरू आहे. पुढील काही महिन्यांत आणखी १२५ बस बस बीआरटी मार्गांवर धावू लागतील. पण, सध्या बसला होणारी गर्दी, बीआरटी मार्गांची दुरवस्था, काही बेशिस्त चालक, वाहनांची प्रचंड कोंडी या कारणांमुळे ई-बसही खिळखिळ्या होण्यास वेळ लागणार नाही, असे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील काही अधिकारीच बोलत आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात मार्गांवर ई-बस धावत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर या बस दाखल झाल्याने प्रवाशांकडून या एसी बसचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे संबंधित मार्गावरील अनेक प्रवासी या बसमध्ये बसण्यासाठी उत्सुक आहेत. तर नेहमी रिक्षाने जाणाऱ्यांची पावलेही ई-बस पाहून थबकत आहेत. ही ‘स्मार्ट’ सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी १२५ ई-बस येण्यास सुरुवात होईल. या १२ मीटर लांबीच्या बस बीआरटी मार्गांवर सोडण्याचे नियोजन आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात निम्म्यांहून अधिक बसचे वयोमान संपल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मनात या बसबाबत नाराजी आहे. हीच स्थिती ई-बसचीही होण्याची भीती काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.

अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार, नऊ मीटर लांबीच्या ई-बसमध्ये ३१ तर १२ मीटर बसमध्ये सुमारे ५१ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. सध्याच्या पीएमपीच्या जुन्या बसमधून ७० ते १०० प्रवासी दररोज प्रवास करतात. बसची वारंवारिता व संख्या पाहता हीच अवस्था ई-बसचीही होऊ लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. एसीच्या यंत्रणेवरही ताण पडेल. त्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. अर्थात नवीन बसमुळे लगेचच परिणाम दिसून येणार नाही. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक बीआरटी मार्गांची सध्याची स्थिती खूपच दयनीय आहे.काही बेशिस्त प्रवाशांकडून या बसमध्येही थुंकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याबाबत प्रशासनाकडे चालक व वाहकांच्या तक्रारी आल्या आहेत. थुंकल्यामुळे बस खराब होऊन इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करतात. पण प्रशासन हतबल आहे. संबंधितांना शोधणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनेक चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. भरधाव वेगात बस नेण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अशा अपघातांमुळे ई-बसचे मोठे नुकसान होऊ शकते. ही एक बस सुमारे सव्वा कोटी रुपयांची आहे. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा खर्चही मोठा आहे. संबंधित कंपनीच हे काम करणार असल्याने पीएमपीवर भार पडणार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन