शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘सिम्बायोसिस’चे संचालक सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 01:37 IST

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही.

पुणे : सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. जवळपास शंभरहून अधिक आजी-माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक अनुपम सिद्धार्थ यांना पदावरून हटवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने याची चौकशी सुरू केली असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून संस्थेतील जवळपास दहा विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषण, तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. त्यानतंर विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती नेमून त्याबाबत चौकशीही सुरू केली. पण गैरवर्तन, तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार केली आहे. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी यांच्याकडे अनुपम सिद्धार्थ यांच्याविषयी ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी दिवसभर विद्यापीठ अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिद्धार्थ यांची चौकशी सुरू होती.विद्यार्थिनींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावरच विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीकडून शनिवारी अनुपम सिद्धार्थ यांच्यावरील तक्रारींची चौकशी सुरू होती. या समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार कुलगुरूंनी त्यांना सखोल चौकशी होईपर्यंत रजेवर पाठविले आहे.- डॉ. विद्या येरवडेकर,प्रधान संचालिका, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ

टॅग्स :Metoo CampaignमीटूPuneपुणे