शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कोल्हटकर अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:58 IST

गकर्मी, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार अशा व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंद्वारे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांना नाट्यक्षेत्रातील मंडळींनी साश्रू नयनांनी शनिवारी अखेरचा निरोप दिला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

पुणे - रंगकर्मी, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार अशा व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंद्वारे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांना नाट्यक्षेत्रातील मंडळींनी साश्रू नयनांनी शनिवारी अखेरचा निरोप दिला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.दिलीप कोल्हटकर यांची दीर्घ आजाराने शुक्रवारी सकाळी प्राणज्योत मालवली; मात्र मुलगा अमेरिकेत वास्तव्यास असल्याकारणाने तो आल्यानंतर, त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अभिनेते अमोल पालेकर, मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाट्य समीक्षक माधव वझे यांच्यासह रंगभूमीच्या क्षेत्रातील काही मान्यवर, मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. कोल्हटकर यांच्या निधनाने रंगभूमी पोरकी झाली असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.दिलीप आणि माझ्यात एक वेगळी मैत्री होती. मुंबईला गावदेवीला राहायला होतो, तेव्हा माझ्या घरी अनेक नाट्यवेडी मंडळी हक्काने येऊन राहायची. त्यामध्ये दिलीपदेखील असायचा. दिलीप बँक आॅफ बडोदामध्ये कामाला होता आणि मी बँक आॅफ इंडियामध्ये होतो. आंतरबँक नाट्य स्पर्धेत आम्हाला अचानक भाग घ्यायला सांगितले; मात्र आमच्या हातात केवळ दोनच दिवस होते. आम्ही नाटककार रत्नाकर मतकरी यांच्याकडे गेलो. ते म्हटले दोन दिवस नाही तीन दिवस हवेत. या स्पर्धेमध्ये बँक आॅफ बडोद्याचे तिसरे नाटक होते आणि आमचे दुसरे. दिलीपला सांगून आम्ही आमचे नाटक एक दिवस पुढे नेण्याची विनंती केली आणि त्यानेही स्पर्धा विसरून त्यांचे नाटक दुसरे घेतले आणि आम्हाला त्यांच्या जागी सादर करण्याची संधी दिली.अशी निखळ स्पर्धा आज कुठेच पाहायला मिळत नाही, अशा शब्दांत अमोल पालेकर यांनी कोल्हटकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.माधव वझे यांनी दिलीप कोल्हटकर हा प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीला साधणारा दुवा असल्याचे सांगितले. मोहन जोशी यांनी कोल्हटकर यांच्या निधनाने रंगभूमीचे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्तकेली.दिलीप माझा मावस भाऊ होता. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही; पण त्याचे काम जवळून पाहिले. रंगभूमीला प्रकाशमान करणारे त्याचे व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत ज्योती सुभाष यांनी कोल्हटकर यांना श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या