शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अध्ययन अपरिहार्य -डॉ. रघुनाथ माशेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 03:34 IST

‘विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षकांना मानसन्मान मिळाला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे डिजिटल अध्ययन भावी काळात अपरिहार्य आहे.

पुणे  - ‘विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षकांना अधिक स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. म्हणूनच शिक्षकांना मानसन्मान मिळाला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे डिजिटल अध्ययन भावी काळात अपरिहार्य आहे. अशा काळात समान पुस्तके, समान परीक्षा यांची गरज राहणार नाही,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आणि आबासाहेब अत्रे दिन प्रशालेस ९० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, संजीव ब्रह्मे, संजीव महाजन, मुख्याध्यापिका उज्ज्वला नवले, रवी चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी गुरुवर्य आबासाहेब अत्रे यांच्या कारकिर्दीवरील ‘शाळा एके शाळा’ या ग्रंथाचे तसेच लघुपटाचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या माजी शिक्षक, विद्यार्थ्यांचाही सत्कारही यानिमित्ताने करण्यात आला.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संपर्क साधत, ‘मातृभाषा, तसेच भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करत संस्थेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका उज्ज्वला नवले, सचिव सुधन्वा बोडस यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आबासाहेब अत्रे यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला. प्राची मोडक यांनी सूत्रसंचालन केले.इंग्रजीच्या न्यूनगंडातून बाहेर या : नितीन करमळकरडॉ. नितीन करमळकर यांनी ‘मराठी माध्यमातून शिकणा-या मुलांना वा त्यांच्या पालकांना इंग्रजी येत नाही, या न्यूनगंडातून बाहेर येण्याची अपेक्षा व्यक्त केली. इंगजी येत नाही म्हणजे आपली प्रगती नाही, असे न मानता मातृभाषेत शिक्षण घेऊनही यशस्वी होता येते, हे व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंगांचे उदाहरण देऊन त्यांनी पटवून दिले.’डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘शाळेत आल्यावर मला आई-आबांचे अस्तित्व जाणवते. येथे शिकताना वडिलांनी त्यांच्या मुली म्हणून कोणतीही सवलत न देता इतर विद्यार्थ्यांच्याबरोबरीनेच वागणूक मला व बहिणीला दिली.’

टॅग्स :Puneपुणे