शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

अपूर्ण राहिलेले घराचे बांधकाम करून ‘मित्रा’ ला वाहिली आगळीवेगळी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 20:42 IST

‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते. त्याच्या प्रथम पुण्यस्मरणदिनीच त्याच्या वर्गमित्रांनी नीलेशच्या घराचे बांधकाम पूर्ण केले.

ठळक मुद्देत्याच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेत व्हॉटस् अ‍ॅपवर ‘एक हात मदती’चा मोहीम उघडली.

रविकिरण सासवडे बारामती : जिवाभावाचा दोस्त नीलेश अपघातात गमवला. शर्थीचे प्रयत्न करूनही आपण नील्याला वाचवू शकलो नाही, याची खंत प्रत्येकालाच होती. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवे, या जाणिवेतून ‘स्वत:चे घर बांधण्याचे त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करायचे,’ असे ठरवून प्रत्येक जण कामाला लागला. रविवारी ( दि.२९ एप्रिल ) रोजी नीलेशचे प्रथम पुण्यस्मरण आहे. याच दिवशी सर्व दोस्त मंडळींनी त्याच्या घराचे बांधकाम पूर्ण करून आपल्या जिवलग दोस्ताला आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.  सोलापूर जिल्ह्यातील कळंबोली (ता. माळशिरस) नीलेश शामराव खरात येथील रहिवासी आहे. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात झाले. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. मागील वर्षी लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यास गेलेल्या नीलेश शामराव खरात याचा पुणे-नगर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात नीलेश गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो कोमात गेला. आई-वडील आणि भाऊ शेतमजूर म्हणून राबतात. नीलेशच्या उपचारांचा खर्च मोठा होता. अशावेळी कळंब महाविद्यालयाच्या त्याच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेत व्हॉटस् अ‍ॅपवर ‘एक हात मदती’चा अशी मोहीम उघडली. या मोहिमेमध्ये महाविद्यालाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गदेखील सहभागी झाला. नीलेशच्या मनमिळाऊ व मेहनती स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. या सर्वांनी आपापल्या परीने नीलेशच्या उपचारासाठी रक्कम जमवली. मात्र आठ दिवस उलटले तरी नीलेश कोमातून बाहेर आला नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा धक्का सर्व वर्गमित्रांना बसला. आपला जिवाभावाचा दोस्त म्हणजे आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य गेल्याची प्रत्येकाची भावना झाली. नीलेशने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले. वालचंदनगर परिसरासत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. याचदरम्यान देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराममहाराज विद्यालयात तो विनाअनुदानित तत्त्वावर नोकरीस लागला होता. वेतन बेताचेच असले तरी ‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने नवीन घराच्या पायाचे बांधकामदेखील पूर्ण केले होते. पैसे येतील तसे घर पूर्ण करणार, असे तो म्हणायचा. मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच नीलेशने या जगाचा निरोप घेतला. नीलेशच्या उपचारासाठी विकास कुंभार, योगेश ढगे, मेघनाथ आवटे, कुलदीप सूर्यवंशी यांनी ‘एक हात मदती’चा मोहीम उघडली होती. मात्र नीलेशच्या मृत्यूनंतर त्याचे अपूर्ण राहिलेले घराचे स्वप्न पूर्ण करायचे त्याच्या उपचारासाठी जमवलेले पैसे घरासाठी वापरायचे. तसेच अजून पैसे लागले तर जमवायचे, असे त्याच्या मित्रांनी ठरवले. त्यासाठी एकही दिवस न थांबता प्रत्येकाने नीलेशचे घर पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली. त्याच्या प्रथम पुण्यस्मरणदिनीच त्याच्या वर्गमित्रांनी नीलेशच्या घराचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकालाच आहे. फक्त हे घर पाहायला आज नीलेश आपल्यात नाही, या भावनेनेच सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.  

टॅग्स :PuneपुणेHomeघर