कोविड केअर सेटरला दिले १० बेड
बारामती : कोविडमुळे निधन झालेल्या पत्नीच्या स्मरणार्थ बारामती एमआयडीसीतील उद्योजकाने कोविड केअर सेंटरला मदत करीत सामाजिक भान जपले आहे. व्हेंन्चर स्टीलच्या वतीने कोविड सेंटरला रुग्णांसाठी स्टेलन्स स्टीलचे उच्च प्रतीचे दहा बेड शुक्रवारी(दि. २३) सुपूर्द करण्यात आले.
महिला शासकीय रुग्णालयच्या नर्सिंग स्कूलमधील कोविड सेंटरला याचा ऐन कोरोना संकटात उपयोग होणार आहे. व्हेंन्चर स्टील प्रा. लि. च्या संचालिका छाया बाबासाहेब शेंडे यांचे ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्याचे पती व्हेंन्चर स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब शेंडे यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा बेड कोविड सेंटरला सुपूर्द केले. या वेळी कंपनीचे अधिकारी प्रतीक करंजकर, अभिजित माने व महिला शासकीय रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. बापूसाहेब भोई व अधिकारी, कर्मचारी आदी होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. त्यामुळे हे संकट निवारण्यासाठी काही दानशूर पुढे येत आहेत. व्हेन्चरच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम हा त्यापैकीच एक आहे. कोरोना निवारणासाठी आवश्यक गरज पाहता प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत ही मदत करण्यात आली, हे कौतुकास्पद आहे. याचा आदर्श इतरांनी घेऊन पुढे यावे, असे ही आवाहन डॉ. भोई यांनी या वेळी केले आहे.
————————————————
फोटो ओळी : बारामती येथील व्हेंन्चर स्टीलच्या वतीने कोविड सेंटरला रुग्णांसाठी दहा बेड सुपूर्द करण्यात आले.
२४०४२०२१ बारामती—०८
———————————————
बातमी फोटोसह आवश्यक