शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावले; महावितरणने त्याच 300 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:06 IST

महावितरणच्या ३०० च्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांहुन अधिक काळापासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ...

पुणे: कोरोना संकटात देखील त्यांनी स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावले. सर्वसामान्य नागरिकांसह मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी कर्तव्यदक्ष राहिले. वाढीव बिल आल्यामुळे कुठे त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना देखील करावा लागला. मात्र महावितरणच्या अशा ३०० च्यावर कंत्राटी कामगारांवर आता मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. 

बारामती ग्रामीण मंडलातील बारामती शहर, ग्रामीण, इंदापूर, सोमेश्वरनगर या ठिकाणच्या विभागांमध्ये जवळपास ३०३ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या ३ महिन्यांहुन अधिक काळापासून वेतन मिळालेले नाही. वायरमन, रिडिंगमन, ऑपरेटर या पदावर काम करत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी महावितरण कोरोना काळात अडचणीत आले असताना खंबीरपणे साथ देत वसुली मोहीम,सातत्यपूर्ण वीजपुरवठा, रिडींग घेणे यांसारख्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे निभावल्या. मात्र काम करून देखील वेतन न मिळाल्यामुळे या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. 

महावितरणच्या बारामती विभागाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीच्या अधिपत्याखाली ही तीनशेच्या वर कंत्राटी कर्मचारी मंडळी काम करत आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आला आहे. प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यापासून कर्मचारी कामावर असताना महावितरण ने मार्च महिन्यात मनुष्यबळ भरतीचा आदेश काढला. या आदेशानंतर कंपनीने डिसेंबर महिन्याचे वेतन अदा केले. पण अद्याप 3 महिन्यांचे वेतन बाकी आहे. 

याबाबत गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे मानसिंग जाधव म्हणाले, काही तांत्रिक कारणास्तव महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतन देता आले नाही. मुळात हे वेतन महावितरणकडून आम्हाला प्राप्त झालेले नाही.मात्र महावितरणने मनुष्यबळ भरतीचा आदेश दिल्यानंतर कंपनीने तात्काळ डिसेंबर महिन्याचा पगार दिला आहे. महावितरणकडून पैसे मिळताच कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन दिले जाईल.

...........

वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

महावितरणकडून बारामती मंडलात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन तातडीने देण्याबाबत कार्यालयीन पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. तसेच संबंधित कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या कंपनीला देखील वेतन देण्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. - चंद्रशेखर पाटील,अधिक्षक अभियंता,बारामती ग्रामीण मंडल.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी