शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

'देशात हुकूमशाही पुन्हा डोकावतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 01:28 IST

किरण नगरकर : नयनतारा सहगल यांना भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार

पुणे : माणसाकडे विचार करण्याची क्षमता आहे. कोणतीही कृती करण्याआधी, निर्णय घेण्याआधी त्याला परिणामांचा विचार करता येतो. परंतु, सध्या भारतीय लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, असा सवाल ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी उपस्थित केला. हिटलर गेल्यानंतर तसा माणूस पुन्हा होणार नाही, असे वाटले होते. मात्र, हुकूमशाही अनेक देशांमध्ये पुन्हा डोकावू लागली आहे, हिटलर परत आलाय, अशा शब्दांत त्यांनी परखड टीका केली.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यावतीने नगरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे सहगल यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभिजित वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. नीलिमा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन केतकर यांनी प्रास्ताविक केले.अल्पसंख्याक दहशतीखाली४व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना सहगल म्हणाल्या, ‘अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत हे कशाचे लक्षण आहे? तुमच्या श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित केला, की लगेच आपल्या विरोधातला आहे, असे समजून एक तर त्याला ऐनकेन प्रकारे तुमच्या विचारधारेशी जुळवून घेण्यास भाग पाडले जाते.४अन्यथा त्यांचा दाभोलकर, कुलबुर्गी, गौरी लंकेश केला जातो. आमच्यासोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवावयास मिळत आहे. अशाने घटनेची पायमल्ली होत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची तर पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धीभ्रम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कला-साहित्य-संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या आहेत.नगरकर म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांना सरदार पटेल यांच्याबद्दल काय माहीत आहे? एवढे पैसे खर्च करून पुतळा उभारण्याऐवजी २५ दवाखाने उभारता आले असते. कोणाचा आदर कसा करावा, हे कळत नाही का? इतिहासातील त्यांना जी हवी आणि जशी हवी तीच व्यक्तिमत्त्वे पुढे येत आहेत. मोठमोठे पुतळे उभारून भारत घडणार नाही, तर प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे.’४बाबा आढाव म्हणाले, ‘काल दुपारी मोदींचे भाषण ऐकल्यावर खूप अस्वस्थ वाटले, तेव्हा भाईची खूप आठवण आली. या देशांमध्ये हजारो वर्षात हिंदू दहशतवादाचे एकही उदाहरण नाही, असे म्हणत त्यांनी नथुरामाचे नाव न घेता श्रद्धांजली वाहिली. सध्या लोकशाहीचा नंगानाच चालू आहे. निवडणुकीत धर्माचा, जातीचा वापर केला जात आहे. सरकारविरोधात बोलले, की तो देशद्रोह ठरवून निर्दोष लोक तुरुंगात धाडले जातात आणि खरे गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरतात.’

टॅग्स :PuneपुणेNayantara Sahgalनयनतारा सहगल