शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धोम-बलकवडी कालवा आवर्तनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 27, 2017 02:06 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. धोम-बलकवडी

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर  होत चालला आहे. धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे  तिसरे आवर्तन दोन दिवसांत सुटले,  तर परिसरातील नागरिकांना  पाणीप्रश्न भेडसावणार नाही़धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन बंद होऊन बरेच दिवस झाले आहेत़ यामुळे परिसरातील अनेक विहिरींची पाणीपातळी घटली असून, विहिरींनी तळ गाठला आहे़ वीसगाव खोरे हे भौगोलिकदृष्ट्या उंचवट्यावर व उथळभाग असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते़ यामुळे उन्हाळ्यात ओढे, नाले, विहिरींना पाणी साठा राहत नाही. परिसरातील ग्रामपंचायतींना नळ पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक विहिरी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने तिसऱ्या आवर्तनाची मागणी नागरिकांकडून होत आहे़ या कालव्याचे तिसरे आवर्तन लवकरात लवकर सुटले, तर कालव्याखालील व वरील भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे कालव्याला पाणी सुटण्याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर उन्हाची तीव्रता, पाणीटंचाई याचा परिणाम या भागातील दुग्धव्यवसाय व अर्थकारणावर मोठ्याप्रमाणावर होत आहे़ वीसगाव खोरे परिसर हा अगोदरच दुष्काळग्रस्त असून, उन्हाळा तीव्र वाढल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे़ यामुळे नागरिक कालव्याच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत.