पिंपरी : निगडीतील नृत्यकला मंदिर आयोजित ‘नृत्यांजली’ कार्यक्रमात कलावर्धिनी निगडी शाखेच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. बहारदार नृत्यास रसिकांनी दाद दिली. निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या मनोहर वाढोकार सभागृहात पार पडला. या वेळी नृत्यकला मंदिराच्या संस्थापिका तेजश्री अडिगे, त्यांच्या गुरू डॉ. सुचेता चापेकर उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविले. राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला.अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या अनय फाटक, अलिशा बोर्डे, श्रावणी कांबळे, वैष्णवी क्षीरसागर, अनुष्का घोबाळे, अनुष्का कळमकर, सत्यज्ञा घळसासी, सृष्टी फंड, अनिका पाटील, अनुष्का बैरागी, बिल्वा नायगावकर, भूमिका भंगाळे, कुमुदिनी पाटील, निकिता राव, सौंदर्या पवार, दीप्ती जोगळेकर, गौरी घाडगे यांना गौरविण्यात आले. पहिल्या वर्षातील वीणा भोसले, अक्षय साबळे,अन्वी बडवे, अभिलाषा साळुंखे यांनी, दुसऱ्या वर्षातील सोनिया कोकाटे, मैत्रेयी जोशी, ज्ञानेश्वरी साळुंखे, वैष्णवी पाटील, तिसऱ्या वर्षातील अदिती रानवडे, इशिता राणे, तन्वेशा शिंदे, चौथ्या वर्षातील हर्षा औटी, साक्षी ससालटे, अवनी देशपांडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटाकावला. पुष्पांजलीने सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी मूळ भरतनाट्यमचे पदन्यासचे सांघिक सादरीकरण केले. ‘अलारिपू’ ही शुद्ध नर्तनाची रचना आणि ‘गीतम’ ही अभिनयाची रचना सादर केली. कल्याणी रागातील ‘जतिस्वरम’ ही शुद्ध नर्तनाची रचना सादर केली. तसेच वर्णम्याकृष्णाच्या जीवनावर आधारित रचना सादर केली. श्रद्धा मंडलेच्या यांनी ‘अघटित सये शिवलीला’, शंकराने केलेला त्रिपुरासुराचा वध दर्शवणारी ‘शिवकौतुक’ ही रचना सादर केली.चापेकर म्हणाल्या, ‘‘मुलांंच्या आवडीप्रमाणे कलेचे शिक्षण देणारे पालकांना धन्यवाद द्यायला हवेत. भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन दिल्याने कलेची वाढ होणार आहे.’’श्रद्धा मंडलेच्या, डॉ. गौरी वैद्य यांनी साहाय्य केले. अश्वथी मेनन यांनी गायनात, एच. वेंकटरामण यांनी मृदंगावर, एन. शेषाद्री यांनी व्हायोलिनवर साथसंगत केली. रेश्मा घाडगे, गौरी घाडगे, आश्लेषा नेमाणे, दीपाली देशपांडे यांनी संयोजन केले. डॉ. गौरी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुजा देशेट्टी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
निगडीत रंगला भरतनाट्यमचा नृत्याविष्कार
By admin | Updated: February 16, 2016 01:11 IST