शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
2
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
3
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
4
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
5
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
6
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
7
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
8
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
9
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
10
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
11
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
12
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
13
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
14
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
15
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
16
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
17
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
18
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
19
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
20
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
Daily Top 2Weekly Top 5

बंद न पाळता धनगर समाजाचे शांततेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:53 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांना वेठीस न धरता या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे. अशा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन, इंदापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने सोमवार (दि. १३) रोजीच्या नियोजित ‘महाराष्ट्र बंद’मध्ये इंदापूर तालुका बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला.

इंदापूर : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांना वेठीस न धरता या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे. अशा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊन, इंदापूर तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने सोमवार (दि. १३) रोजीच्या नियोजित ‘महाराष्ट्र बंद’मध्ये इंदापूर तालुका बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘बंद’ऐवजी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.परंतु, सतत बंद व आंदोलने यांच्यामुळे नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता व बाजारपेठेत असलेली मंदी, शेतकऱ्यांची दुष्काळसदृश परिस्थिती, किरकोळ व्यापारी यांचे ‘बंद’मुळे होणारे नुकसान व सणासुदीचा काळ याचा विचार करून आजचा बंद मागे घेण्यात येत आहे; परंतु धनगर आरक्षणाचा लढा शासन दरबारी यापुढे अधिक तीव्रतेने लढण्याचा निर्धार करण्यात येत आहे. तरी सर्व व्यापारी, व्यावसायिक, वाहतूकदार, सामान्य नागरिक यांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवावेत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भात, तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीचे समन्वयक पोपट पवार, महेंद्र रेडके, अमोल भिसे, किरण गोफणे, माऊली वाघमोडे, नानासाहेब खरात, दत्तात्रय पांढरे, अप्पा माने, सचिन सूळ, संपत पुणेकर,भागवत वाघमोडे, सतीश शिंगाडे यांच्या सह्यांनी प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे.धनगर आरक्षणाच्या संदर्भात राज्यभरात वेगवेगळी आंदोलने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती; पण गेल्या महिनाभरातील आंदोलनांमुळे राज्यातील जनतेला जो त्रास सहन करावा लागला, तो पाहता सामान्य जनतेला वेठीस धरून आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा ज्यांच्याकडे या प्रश्नावर निर्णय घेण्याची क्षमता आहे, अशा मंत्रिमंडळ व न्याय व्यवस्थेकडे धनगर आरक्षणाबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे इंदापूर तालुका तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीने या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.  भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने आंदोलनभिगवण : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचा मार्ग न स्वीकारता समाजाची भूमिका सनदशीर मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्यात आली. बंद न करण्याच्या धनगर समाजाच्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने सोमवारी येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, संपत बंडगर, आबासाहेब बंडगर, सतीश शिंगाडे, अरविंद देवकाते, अमित देवकाते, कुंडलिक बंडगर, जिजाराम पोंदकुले, तेजस देवकाते, अण्णा धवडे, सुरेश बिबे व धनगर समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य घटनेनुसार धनगर समाजाचा समावेश हा अनुसूचित जमातीमध्येच आहे. परंतु धनगड व धनगर असा वाद निर्माण करून धनगर समाजाला मागील सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवल्याची भावना या वेळी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.समाजाच्या मागण्यांचे निवेदन भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांना देण्यात आले. आंदोलनासाठी भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेले परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबास २५ लाखांची आर्थिक मदत करावी, धनगर समाजातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, मेंढपाळांना गायरान जमिनी राखीव ठेवाव्यात, पावसाळ्यात वनजमिनीवर मेंढपाळांना चराई कुरणे राखीव ठेवावीत आदी मागण्या करण्यात आल्या.धनगर समाजाच्या ‘बंद’ला दौैंड तालुक्यात संमिश्र प्रतिसादराहू : धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राहू ग्रामस्थांनी व व्यापाºयांनी बाजारपेठ बंद ठेवून प्रतिसाद दिला. सकाळी धनगर समाजाचे युवक मोठ्या संख्येने महात्मा फुले चौकात जमा झाले.आरक्षण अंमलबजावणीची घोषणा देत महात्मा फुले चौक ते महादेव मंदिरादरम्यान मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. नंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करून या वेळी रस्त्यावरच सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत युवकांनी शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने गेल्या चार वर्षांत धनगर समाजाची मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप रासपचे नेते बाळासाहेब गरदरे यांनी केला.या वेळी तात्यासाहेब तेळे, दत्तोबा डुबे, बाळासाहेब कारंडे, शहाजी डुबे, सागर डुबे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :reservationआरक्षणMaharashtraमहाराष्ट्र