शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ते उधळण करीत जेजुरीत कुलदैवताचे भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:39 IST

सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत दोन लाखाहून अधिक भाविकांनी ‘सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात आणि भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत कुलदैवताचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देवर्षातून दोन वेळा भरणाऱ्या खास सोमवती यात्रांना विशेष महत्त्वहजारो भाविकांच्या उपस्थितीत दही, दूध, कऱ्हेचे पाणी आदींसह देवाला घालण्यात आले स्नान

जेजुरी : सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत दोन लाखाहून अधिक भाविकांनी ‘सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात आणि भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत कुलदैवताचे दर्शन घेतले. वर्षातून दोन वेळा भरणाऱ्या खास सोमवती यात्रांना विशेष महत्त्व असते. सोमवारी सोमवती यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती. सोमवती अमावस्येला रविवारी (दि. १७) सकाळी ११.५९ वाजता प्रारंभ झाला होता. ती आज सकाळी १२ वाजेपर्यंतच पुण्यकाळ होता. यामुळे सूर्याला अमावस्या असतानाच देवाच्या उत्सवमूर्तींना कऱ्हेचे स्नान घालणे आवश्यक असते. आज सोमवारी पहाटे ६ वाजता जेजुरीगडावरून उत्सवमूर्तीची पालखी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहाटेचे झुंजुमुंजू वातावरण आणि थंडी असूनही सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविकांनी जेजुरीत व गडावर गर्दी केलेली होती.देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, तुषार सहाणे, शिवराज झगडे व पंकज निकुडे उपस्थित होते. पहाटे ६ वाजता उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. गडकोटातील प्रमुख मंदिराच्या प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्रीखंडोबा व म्हाळसादेवींची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आली. निशाण, अश्व, चामरे, आबदानी, सनई चौघडा, तसेच सोलो वादनाच्या मंगल सुरात सोहळा सुरू झाला. अत्यंत उत्साहात पालखीचे खांदेकरी, मानकरी पालखीला खांद्यावर घेऊन गडकोटातून बाहेर पडत होते. यावेळी उपस्थित भाविकांकडून देवाचा जयघोष सुरू होता, तर भंडार-खोबºयाची मुक्त हस्ताने उधळण होत होती. विद्युत प्रकाशझोतातील सोहळ्यावर भंडाऱ्याची होणारी उधळण सोन्याच्या जेजुरीचा अनुभव देत होती. गडकोटातून बाहेर पडलेला हा सोहळा मुख्य पायरीमार्गावरून नंदी चौकात आला. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील छत्री मंदिराचा मान स्वीकारून सोहळ्याने कऱ्हेकडे कूच केले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांकडून या सोहळ्यावर मुखातून देवाचा जयघोष आणि भंडार- खोबऱ्याची उधळण होत होती. सकाळचा सोहळा असून ही राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी जाणवत होती. शहरातील मुख्य चौकातून निघालेल्या सोहळ्याने जेजुरी ते कऱ्हा नदी ५ किलोमीटरचे अंतर पार करीत सकाळी १०.३० वाजता कऱ्हेकाठी पोहोचला. या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दही, दूध, कऱ्हेचे पाणी आदींसह देवाला स्नान घालण्यात आले. उत्सवमूर्तींची विधिवत पूजा व समाजआरती उरकण्यात आली. देवाच्या स्नानाबरोबरच उपस्थित हजारो भाविकांनी ही कऱ्हास्नान उरकले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. सोहळ्याने धालेवाडी, कोरपडमळामार्गे ठिकठिकाणच्या पालखी मार्गावरील मानकऱ्यांचा मान स्वीकारत ग्रामदेवता जानाईदेवीच्या प्रांगणात दुपारी दीड वाजता येऊन विसावला. संपूर्ण दिवसभर उत्सवमूर्तींची पालखी या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी जानाई मंदिरातून सोहळ्याने गडाकडे कूच केले. 

रविवारी व सोमवारी अमावस्येचा पर्वकाल असल्याने सलग दोन दिवस जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी होती. जेजुरीगडाच्या दर्शनाबरोबरच जयाद्रीच्या डोंगररांगांतील कडेपठार मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होती. पुणे, मोरगाव, नीरा आदी मार्गांवर जेजुरीत येणाऱ्या वाहनांची सुमारे दोन-दोन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणाचा पोलिसांवर मोठा ताण येत होता. मात्र पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे वाहतूक संथगतीने, पण व्यवस्थित राहिली होती. मोठ्या वाहनांना शहरात बंदी केलेली असल्याने नियोजित वाहनतळे वाहनांनी भरून गेली होती. वाहने बाहेरच राहिल्याने शहरात गर्दीचा ताण कमी राहिल्याने भाविकांना गडकोटाकडे जाऊन दर्शन घेणे सुलभ झाले. यात्रेच्या बंदोबस्तासाठी सुमारे ११० पोलीस कर्मचारी आणि १२ पोलीस अधिकारी तैनात केले होते. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाकडूनही जादा बसगाड्यांची सोय केलेली होती. सोमवती यात्रेचा सोहळा पहाटेच्या वेळी असल्याने त्यातच प्रचंड गर्दी राहिल्याने खिसेकापूंनी चांगलाच हात मारला. साखळीचोरी, मोबाइलचोरी, खिसेमारीचे असंख्य प्रकार घडले आहेत.   सकाळी ११ वाजता उत्सवमूर्तींचे कºहास्नान उरकल्यानंतर भाविक आपापल्या वाहनाने किंवा मिळेल त्या वाहनाने माघारी जात होते. सायंकाळपर्यंत संपूर्ण शहर मोकळे झाले होते. 

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्राPuneपुणे