शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

देवगड हापूसचे बाजारात आगमन, पुण्यात हंगामातील पहिली आवक : पेटीला पाच हजार रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:34 IST

१५ दिवसांपासून रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला असून ग्राहकांकडून त्याला पसंती मिळत आहे. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची ५० पेटी आवक झाली.

पुणे : देवगड हापूसचा हंगाम सुरू झाला असून पुण्यात रविवारी चालू हंगामातील देवगड हापूस दाखल झाला. मार्केट यार्डातील फळबाजारात देवगड हापूसची सहा पेटी आवक झाली. देवगडच्या पाच ते सहा डझनाच्या पेटीला पाच हजार रुपये दर मिळाला.हवामानातील बदलामुळे देवगड हापूसचा हंगाम सुरू होण्यास १० ते १५ दिवस उशीर झाला. मात्र, कुणकेश्वर येथील शंकर नाणेरकर या शेतक-याच्या शेतातील पहिला देवगड हापूस पुण्यात दाखल झाला. पातळ कातडीचा अधिक गर असलेला आणि चवीला गोड असल्याने या आंब्याला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. तसेच अधिक उष्ण हवामानात हा आंबा टिकत नाही. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच देवगड हापूसला सुरुवात होते. तसेच मार्च-एप्रिल महिन्यातच देवगड हापूसचा ८० टक्के हंगाम संपतो. त्यातच ग्राहकांकडूनही या आंंब्याला अधिक मागणी असते. येत्या आठवड्याभरात देवगड हापूसची सुरळीत आवक सुरू होईल, असे आंब्यांच्या व्यापाºयांनी सांगितले.आंब्याचे व्यापारी युवराज काची म्हणाले, की देवगड हापूसची अजूनही लोखंडी ट्रंकेतून आवक होत आहे. अधिक उष्ण वातावरणात तो टिकत नाही. एप्रिल ते जूनदरम्यान हा आंबा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवगड हापूसचा हंगाम लवकर संपतो. पुण्यात प्रथमच सहा पेटी आवक झाली असून मज्जीद बागवन यांनी देवगड हापूसची खरेदी केली आहे. हंगाम आणखी लवकर सुरू झाला असता, तर एका पेटीला १० हजार रुपयांचा दर मिळाला असता.१५ दिवसांपासून रत्नागिरी हापूस बाजारात दाखल झाला असून ग्राहकांकडून त्याला पसंती मिळत आहे. रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची ५० पेटी आवक झाली.४-६ डझनाच्या पेटीला ३ ते ५ हजार रुपये दर मिळत आहे.

टॅग्स :alphonsoहापूस आंबाPuneपुणे