शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास : श्वेता शालिनी; सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहातर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:13 IST

सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते.

ठळक मुद्देभारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून : श्वेता शालिनीसामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी करण्यात आला सन्मान

पुणे : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार श्वेता शालिनी यांनी व्यक्त केले.सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. या वेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, टि. म. वि.च्या समाजकार्य विभागाचे डॉ. प्रकाश यादव, सी.एस.आर. सदस्य प्रदीप तुपे, ससूनचे समाजकार्य अधीक्षक सत्यवान सुरवसे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मुख्य संयोजक शेखर मुंदडा, सोशल सिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरुडकर उपस्थित होते.  श्वेता शालिनी म्हणाल्या, ‘‘भारतातील ५० टक्के जी. डी. पी. खेड्यांमधून येतो. खेड्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे; परंतु तेथील लोकांचे सबलीकरण होण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.’’योगेश गोगावले म्हणाले, ‘‘परिस्थिती, काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्येदेखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील; परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करू या. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडू वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्यांची गरज आहे.’’सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. वनराईचे मुकुंद शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राहुल पाटील, गणेश बाकले, वैभव मोगरेकर, प्रशांत खांडे, सूरज पोळ, रत्नाकर कोष्टी, अमोल उंबरजे, विजय दरेकर, संदीप फुके, राज देशमुख, शशी काटे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रीती काळे, डॉ. मनीषा दानाने, वसुधा देशपांडे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे