शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

विकास आराखडा सादर

By admin | Updated: January 24, 2016 02:01 IST

बहुचर्चित बारामती नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्याचा नकाशा आज विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. विकास आराखड्यात ज्या विद्यमान

बारामती : बहुचर्चित बारामती नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्याचा नकाशा आज विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. विकास आराखड्यात ज्या विद्यमान नगरसेवकांच्या भूखंडावरदेखील आरक्षण टाकण्यात आले आहे त्यांच्यामध्ये नाराजी होती, तर अन्य नगरसेवकांनी नकाशा पाहिल्यानंतर ‘आपला भूखंड सुटला बाबा...’ अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली. बारामतीकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या या विकास आराखड्यावर कोणतीही चर्चा न होता, अगदी पाच मिनिटांतच मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे नगरसेवकांनीदेखील नकाशा पाहिला नव्हता. या बहुचर्चित विकास आराखड्यावर सर्वांचे लक्ष होते. आराखड्यावरून राजकीय सुंदोपसुंदी झाली. आज विशेष सर्वसाधारण सभेत कोणतीही चर्चा न होता, विकास आराखड्याचा प्रारूप नकाशा सादर करण्यात आला. आराखड्यावर चर्चा करून नगररचनाकाराकडून नगरपालिकेच्या नगरसेवकांना माहिती मिळावी, अशी मागणी होती. त्यानंतर जनतेसाठी नकाशा खुला करावा, अशी भूमिका नगरसेवकांची होती. त्याला बगल देण्यात आली. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात सभा पार पडली. काही मिनिटांतच विकास आराखड्याच्या नकाशाला मंजुरी दिली. बारामती नगरपालिकेची हद्द २०१२मध्ये वाढली. नगररचना विभागाने नोव्हेंबर २०१५ या महिन्यात विकास आराखडा सादर केला. त्याच्या मंजुरीसाठी १६ जानेवारी रोजीची सभा तहकूब केली. आज त्यासाठी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी वाढीव हद्दीतील प्रारूप विकास आराखडा सादर केला. या विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी नियोजन समिती गठीत केली जाणार आहे. बारामतीच्या जुन्या हद्दीचे क्षेत्र ४३४ हेक्टर आहे तर वाढीव हद्दीचे क्षेत्र ५०५८. ७८ हेक्टर आहे. जवळपास १० पट बारामतीची हद्द वाढली आहे. वाढीव हद्दीतील जळोची, रूई, बारामती ग्रामीण आणि तांदूळवाडी उपनगरांच्या विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)चर्चेविना विकास आराखडा मंजूर (पान ३)उपनगरनिहाय आरक्षणेबारामती ग्रामीणमध्ये २७ आरक्षणे सुचवली आहेत. त्यामध्ये उद्याने, पोलीस चौकी, एसटी बसथांबा, वाहनतळ, अग्निशमन, खेळाचे मैदान, दफनभूमी, प्राथमिक शाळा, हॉकर्स झोन, भाजी मंडई, व्यापार संकुल, गृहनिर्माण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे. १८.११ हेक्टर क्षेत्र आरक्षित होणार आहे. तांदूळवाडीत २२ आरक्षणे आहेत, त्यामध्ये प्राथामिक शाळा, मैदान, टाऊन हॉल, कत्तलखाना, घनकचरा प्रकल्प आदींसाठी १४.७२ हेक्टर क्षेत्र व्यापणार आहे. रूईमध्ये १० आरक्षणे आहेत. त्यामध्ये उद्यान, भाजी मंडई, सांडपाणी प्रकल्प, आदीसाठी ६.४० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. हरकती-सूचनांसाठी नियोजन समितीविकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना आराखड्याचा नकाशा राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांत घेण्यात येणार आहेत. त्यासाठी नगररचना विभाग, आवक-जावक विभाग सुट्टीच्या दिवशीदेखील कार्यरत राहणार आहे. हरकती-सूचनांवर सुनावणीसाठी ७ जणांची नियोजन समिती स्थापन होणार आहे. नगरपालिकेच्या स्थायी समितीचे तीन सदस्य - नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, नगरसेवक सुभाष ढोले, नगरसेवक किरण गुजर यांंचा समावेश आहे. तर ४ सदस्य शासननियुक्त असतील. हरकती घेण्यासाठी नागरिकांना भागनकाशा ५०० रुपये, संपूर्ण विकास आराखड्याचा नकाशा ५००० रुपये शुल्क आकारून उपलब्ध होईल. पालिकेकडून उपलब्ध झालेला नकाशाच हरकतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले. वाढीव हद्दीत १४ उद्याने होणार...विकास आराखड्यात तब्बल १४ उद्याने, ११ खेळाची मैदाने, ५ प्राथमिक शाळा, व्यापार संकुल, भाजी मंडईसह १८, वाहनतळासाठी ११, सार्वजनिक वापरासाठी ९, नागरी सुविधांसाठी १९, सार्वजनिक गृहनिर्माणसाठी १ हेक्टर, झोपडपट्टी पुनर्विकास ०.७७ हेक्टर, टाऊन हॉलसाठी ०.५० हेक्टर अशी एकूण ९१ आरक्षणे आहेत. वाढीव हद्दीतील ५ हजार ५८.७८ हेक्टरपैकी फक्त ६७.६७ हेक्टर क्षेत्रावर आरक्षण सुचवण्यात आले आहे. यापूर्वी प्रादेशिक योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे निवासी रेखांकने मंजूर झाल्यामुळे कोणाला बाधा या विकास आराखड्यामुळे झालेली नाही, असे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सांगितले. जळोचीत सर्वाधिक ३२ आरक्षणांचा समावेश आहे. भाजीमंडई, खेळाचे मैदान, झोपडपट्टी विकास, घनकचरा प्रकल्प, ट्रक टर्मिनस, सांडपाणी व्यवस्था, व्यापार संकुल, मटन-मासे मार्केट आदींसाठी २८.४४ हेक्टर क्षेत्र आरक्षित होणारआहे.सर्वसाधारण सभेत कोणतीही चर्चा न होता, विकास आराखड्याचा प्रारूप नकाशा सादर करण्यात आला. आराखड्यावर चर्चा करून नगररचनाकाराकडून नगरपालिकेच्या नगरसेवकांना माहिती मिळावी, अशी मागणी होती. त्यानंतर नकाशा खुला करण्याची भूमिका नगरसेवकांनी मांडली.