शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वास्तू विकासात नागरिकांचाही सहभाग, अंदाजपत्रकात तरतूद करणार, प्रत्येक प्रभागासाठी १ कोटी रुपये  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:13 IST

‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ यासाठी आता नागरिकांना आपल्या भागातील ऐतिहासिक वास्तूंच्या विकासात सहभाग घेता येईल. अशा वास्तूंसाठी ते नागरिकांचा सहभाग या अंदाजपत्रकातील शीर्षकासाठी कामे सुचवू शकतात; मात्र या कामांना खर्चाची मर्यादा टाकण्यात आली आहे. तरीही सुरुवात म्हणून ही चांगली गोष्ट असल्याचे पदाधिकारी व अधिका-यांचे म्हणणे आहे.

पुणे : ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ यासाठी आता नागरिकांना आपल्या भागातील ऐतिहासिक वास्तंूच्या विकासात सहभाग घेता येईल. अशा वास्तूंसाठी ते नागरिकांचा सहभाग या अंदाजपत्रकातील शीर्षकासाठी कामे सुचवू शकतात; मात्र या कामांना खर्चाची मर्यादा टाकण्यात आली आहे. तरीही सुरुवात म्हणून ही चांगली गोष्ट असल्याचे पदाधिकारी व अधिका-यांचे म्हणणे आहे.गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या अंदापत्रकात ‘नागरिकांचा सहभाग’ हे लेखाशीर्ष वापरण्यात येते. यामध्ये प्रभागातील नागरिकांनी त्यांना प्रभागात आवश्यक वाटणारी कामे सुचवणे अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाला १ कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. एका प्रभागात ४ वॉर्ड याप्रमाणे प्रत्येक वॉर्डासाठी २५ लाख रुपये याप्रमाणे तरतूद येते. ही तरतूद फक्त नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठीच वापरण्यात येते. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या या कल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.असे असले, तरीही या कामांना व त्यासाठीच्या खर्चालाही मर्यादा आहेत. एका व्यक्तीला एकच काम सुचवता येते. त्यासाठी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येत नाही. कामांचे स्वरूप किरकोळ म्हणजे गल्लीतील एखाद्या कोपºयाचे डांबरीकरण, गटारीवरची जाळी बसवणे असेच असते. अगदी अपवाद म्हणून एखादे चांगले काम सुचवलेले असते. त्यामुळे आता त्या त्या प्रभागातील ऐतिहासिक वास्तूच्या भोवतालची काही कामेही नागरिकांना सुचवता येतील, अशी सुधारणा यात करण्यात आली आहे.बहुतेक प्रभागांमध्ये ऐतिहासिक वास्तू असतात. त्याची पडझड झालेली असते. महापालिकेने अशा वास्तूंच्या विकासासाठी हेरिटेज सेल तयार केला आहे. त्याला महापालिका स्वतंत्र आर्थिक तरतूद करून देते. त्यातून कामे होतच असतात; मात्र वास्तू भोवतालच्या कामांसाठी पैसे खर्च करता येत नाही. ती उणीव आता या नागरिकांस सहभाग अंदाजपत्रकातून दूर करता येणार आहे. त्याप्रकारची कामे नागरिक सुचवू शकतात. नगरसेवकांकडून आपल्या प्रभागातील नागरिकांना या अंदाजपत्रकातील त्यांच्या सहभागाची माहिती दिली जावी, असे प्रशासनाला अपेक्षित आहे; मात्र असे काही न होताही नागरिकांकडून या योजनेसाठी चांगला सहभाग मिळतो आहे, दरवर्षी त्यात वाढ होत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.एका व्यक्तीने काही ऐतिहासिक दस्तऐवज मोडीत भाषांतर करण्याचे काम यात सुचवले आहे. त्यासाठी बराच पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे ही सुधारणा झाली आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून, तो आपल्या प्रभाग समिती कार्यालयात द्यायचा आहे. समितीच्या सभेत त्याबाबत निर्णय घेतला जाईल.- उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे