शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीशिवाय वडगावशेरी मतदार संघात 50 कोटींचा विकास निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:58 IST

आमदार टिंगरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात सर्वाधिक निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणला आहे...

पुणे : राज्यात सत्ता असल्याने वडगावशेरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे (sunil tingare) यांनी आतापर्यंत आमदार निधीशिवाय तब्बल 50 कोटींना विकास निधी मिळविण्यात यश आले आहे. शहरामध्ये असा विशेष व ठोस निधी मिळविण्यात टिंगरे आघाडीवर आहेत. तर आमदार निधी शंभर टक्के खर्च खर्चण्याचे नियोजन पूर्ण केले असून, मार्च अखेर पर्यंत सर्व निधी खर्च होणार असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुण्यात आघाडी सरकारचे दोन आमदार आहेत. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात सर्वाधिक निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणला आहे. या मध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून 20 कोटींचा सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यात 17 कोटींचा निधी हा रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांसाठी तर 3 कोटींचा निधी विद्युत  कामांसाठी मिळाला आहे. तर जिल्हा वार्षीक योजनेच्या माध्यमातून चालू आणि गत आर्थिक वर्षातील अशी एकूण 7 कोटी 72 लाखांची कामे मंजूर झाली आहेत.

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मतदारसंघात मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या तीन गावांसाठी 1 कोटीचा स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणा योजनेंतर्गत 1 कोटींचा निधी मिळाला आहे. या शिवाय नाबार्ड योजनेंतर्गत लोहगाव - वडगाव शिंदे पूल बांधण्यासाठी दीड कोटी, लोहगाव-वाघोली रस्त्यासाठी  साडेचार कोटी, मांजरी- कोलवडी रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख , प्रमुख जिल्हा मार्ग योजनेंतर्गत हडपसर - मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी आणि राष्ट्रीय मार्ग योजनेंतर्गत मुंढवा- केशवंनगर - कोलवडी रस्त्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.सर्वाधिक निधी लोहगावलालोहगावचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी या गावांसाठी पुरेसा निधी महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी 7 कोटींचा सर्वाधिक निधी लोहगावला दिला आहे. तर मांजरी खुर्दला 4 कोटी 75 लाख, निरगुडी गावाला 2 कोटी 25 लाख आणि वडगाव शिंदे 2 कोटी 68 लाख इतका निधी विविध विकासकांमासाठी दिला असून,  उर्वरित 35 हुन अधिक कोटींचा निधी वडगाव शेरीतील मतदारसंघातील पालिका हद्दीतील कामांसाठी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाpimpri-acपिंपरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडvadgaon-sheri-acवडगाव शेरी