शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची; पुण्यात दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:04 IST

अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी ‘दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची’या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिव्यांग व्यक्ती समाजाच्या मूळ प्रवाहत कशा येऊ शकतात याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनदिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थासह विविध कंपन्यांचे उभे केले जाणार स्टॉल

पुणे : अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी ‘दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची’या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अल्प बचत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.दिव्यांग व्यक्तींना उद्योग, व्यावसाय करायचा असल्यास भागभांडवल कसे उपलब्ध करता येते. कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण केल्याने कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. तसेच दिव्यांग व्यक्ती समाजाच्या मूळ प्रवाहत कशा येऊ शकतात याबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल आहे, असे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यशाळेत दिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थासह विविध उद्योगिक कंपन्यांचे स्टॉल उभे केले जाणार आहेत. कार्यशाळेच्या उद्घाटनास सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री गिरीश बापट, विभागाचे सचिव दिनेश वाघमारे उपस्थित राहणार आहेत, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेgirish bapatगिरीष बापटPuneपुणे