शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फळांची प्रतवारी करण्याचे तंत्रज्ञान विकसित : लोणीतील प्राध्यापकाचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:05 IST

राहता तालुक्यातील लोणी येथे पी. व्ही. पी. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात कार्यरत आहेत. या यंत्रांचा शोध लावल्यावर त्याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाला प्रबंध सादर, यंत्राकडून माणसांप्रमाणे वास घेऊन प्रतवारी या यंत्राच्या साहाय्याने फळ विक्रेत्यांना फळाची पक्वता व गुणवत्ता समजू शकणार

पुणे : फळांंना चांगला दर मिळवण्यासाठी त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे असते, ही प्रतवारी करण्याचे किचकट काम इलेक्ट्रॉनिक यंत्राव्दारे करण्याचे तंत्रज्ञान लोणी येथील पी. व्ही. पी. महाविद्यालयाचे प्रा. अशोक कानडे यांनी शोधून काढले आहे. त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ आणि ‘फ्रूट सॉर्टर’ अशी दोन यंत्रे विकसित केली आहेत.  प्रा. अशोक कानडे यांनी हे संशोधन पेरू फळाविषयी केले असून ते इतरही फळांसाठी लाभदायी ठरू शकते. या यंत्राच्या साहाय्याने फळ विक्रेत्यांना फळाची पक्वता व गुणवत्ता समजू शकणार आहे. त्यामुळे या तंत्राचा व्यवहारात उपयोग शक्य आहे, असे कानडे यांनी व्यक्त केले. ते राहता तालुक्यातील लोणी येथे पी. व्ही. पी. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात कार्यरत आहेत. या यंत्रांचा शोध लावल्यावर त्याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे. या संशोधनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व इलेक्टॉनिक सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी मार्गदर्शन केले.पेरू फळाच्या वर्गीकरणासाठी (क्लासिफिकेशन) आणि प्रतवारी (ग्रेडिंग) करण्यासाठी या यंत्रांचा वापर करता येतो. या यंत्रांना मेटल आॅक्साइड सेमिकंडक्टर सेन्सर असे म्हटले आहे. स्थानिक शेतकºयांच्या गरजांचा अभ्यास करून प्रा. कानडे यांनी हे तंत्रज्ञान शोधले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पेरूसह इतर फळ उत्पादकांनाही या यंत्रांच्या सहाय्याने चांगल्या प्रतीची फळे बाजारपेठेत पाठवता येतील. योग्य पद्धतीने वर्गीकरण झाल्याने दर त्यानुसार देता येतील आणि फ्रुट सॉर्टरमुळे फळाच्या आतमधील किड किंवा तत्सम प्रकार समोर येतील. त्यामुळेही चांगल्या दर्जाचे कीड विरहित फळ देता आल्याने दर उत्तम मिळू शकेल. एकूणच शेतकºयांना आपल्या फलोत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी हे सहाय्यक पाऊल ठरणार आहे. 

................

प्रा. अशोक कानडे यांनी तयार कलेले ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ हे माणसाप्रमाणे वास ओळखून फळ किती पिकले आहे त्यानुसार प्रतवारी सांगते. प्रत्यक्ष माणूस वास घेऊन फळ पिकले आहे की नाही हे फार वेळ बरोबर ओळखू शकत नाही. कारण सतत वास घेतल्याने काही वेळाने प्रतवारी अचूक सांगणे शक्य होत नाही. मात्र यांत्रिक पद्धतीने कमी वेळात अधिक फळांची अचूक प्रतवारी करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर यंत्रामुळे निर्दोषता वाढण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेfruitsफळे