शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

" अयोध्येतील राम मंदिराचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने केली होती विचारणा..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:11 IST

श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत...

ठळक मुद्देराम जन्मभूमी मंदिर निर्माण व  निधी संकलन अभियानकेंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार

पुणे : मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार न्यासाने केलेला नाही. तर स्वतःचा असा अंदाज आहे की मंदिराच्या आतील बाजूला सुमारे ३०० ते ४०० कोटींचा खर्च लागू शकतो. तर मंदिराच्या बाहेरच्या (प्रकोटाचा) विकासासाठी एकूण खर्च अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतो.  या प्रकोटाचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र नाव लागणार नाही असे सांगून तो प्रश्न तिथेच मिटवला. तर देशातील सामान्य व्यक्तीला देखील मंदिरासाठी दान करता यावे त्यांच्या दानातून मंदिर उभारले जावे. सामान्य व्यक्तीच्या राम भक्तीला समाधान देणारा या अभियानाचा मूळ हेतू आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले. 

राम जन्मभूमी  मंदिर निर्माण व  निधी संकलन अभियान याविषयी माहिती देण्यासाठी निधी निर्माण पश्चिम समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ३१ डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी  परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर , रा.स्व . संघ प्रांत कार्यवाह डॉ . प्रवीण दबडघाव , प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे , पूणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते.      गिरी महाराज म्हणाले की,  या कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांती पासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलनाचे केले जाणार आहे.  यासाठी एक हजार, शंभर, दहा रुपयांचे कुपन छापण्यात आलेली आहेत. एकूण ५०० कोटींची ही कुपन छापलेली आहेत.  या कुपनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावातील ५० लाख कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.  

या कार्यासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार आहे. परदेशी निधी घेण्याची सध्या नाही. मात्र परवानगी मिळताच परकीय देशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.    .........................राम मंदिर संपूर्ण विश्वाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, हा हेतू आहे. तसेच मुख्य कार्य म्हणजे राम मंदिर निर्माण झाल्यानंतर हे पूजे अर्जेचे मंदिर न राहता सांस्कृतिक तसेच चेतना जाणणारे केंद्र निर्माणाचा प्रयत्न असणार आहे. श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत. मंदिराचा जागेवर २००० फुटापर्यत वाळू , रेती असल्याने ते मंदिर १ हजार वर्षापर्यत टिकावे यासाठी आयआयटीची तज्ज्ञांच्या समिती नेमण्यात आली आहे. असे गिरी महाराज म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर