शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वणवा विझवताना भाजलेल्या वनकर्मचा-याचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 02:30 IST

आपटी (ता. भोर) येथील वनजमिनीत लागलेला वणवा विझवताना ७५ टक्के भाजलेले भोर वन विभागाचे कर्मचारी सदाशिव त्रिंबकअप्पा नागठाणे (वय ४५, रा. भोर, मूळ मु. पो. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मुत्यू झाला.

भोर : आपटी (ता. भोर) येथील वनजमिनीत लागलेला वणवा विझवताना ७५ टक्के भाजलेले भोर वन विभागाचे कर्मचारी सदाशिव त्रिंबकअप्पा नागठाणे (वय ४५, रा. भोर, मूळ मु. पो. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मुत्यू झाला. वणवा विझवण्यासाठी १० वनरक्षक, १ वनपाल आणि २२ वनमजूर काम करीत होते. त्यात सदाशिव नागठाणे हे होते. मात्र, कोणतीही साधनसामग्री नसल्याने झाडांच्या पानांनी आग आटोक्यात येत नव्हती. अचानक आग वाढल्याने नागठाणे यांच्या अंगावर लोळ आला आणि त्यात ते ७० टक्के भाजले होते. तर, होनराव यांनी या वेळी खड्ड्यात उडी मारल्याने त्यांचा पाठीचा कणा भाजला होता; मात्र ते बचावले. आपला सहकारी आगीत जळत आहे, हे पहिल्यावर होनराव यांनीने कोणताही विचारन करता नागठाणे यांना आगीतून बाहेर काढले. ६०० फूट डोंगरावरून खाली आणले. बाकीच्या सहकाºयांना पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. त्यानंतर रोडवर आल्यावर गाडी मिळायला वेळ गेला. तेथून भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले; मात्र ७५ टक्के भाजल्याने त्यांना खेड-शिवापूर येथील खासगी दवाखान्यात नेले. दि. २९ डिसेंबर रोजी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी ४ वाजता उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सदाशिव नागठाणे ४ वर्षांपूर्वी अंशकालीन कर्मचारी म्हणून भोर वन विभागात कामाला लागले होते. त्यांना ७ वर्षांचा मुलगा व ५ वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.सुरक्षित साधने नाहीतअचानक वणवा लागला, तर वन विभागाकडे कोणतीही साधनसामग्री नसल्याने झाडांचा पाला काढून आग विझवावी लागते. हे अनेकदा जिवावर बेतते. त्यामुळे वन कर्मचाºयांना साधनसामग्री देणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. याचा वन विभागाने विचार करायला हवा.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या