शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दडपशाहीला न जुमानता आंदोलन करणारच - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:56 IST

राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे.

पुणे : राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. तसेच राज्य शासनाने संघटनेच्या कार्यकर्त्यांची कितीही धरपकड केली तरी या दडपशाहीला न जुमानता दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ किंवा तेवढे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता शेट्टी यांनी आंदोलनाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव देणारे दूध भुकटीच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांनीच दुधाचा भाव पाडला आहे. कमी भाव त्यांच्याकडूनच मिळत आहे. केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने भुकटीचे भाव पडले. आता सरकारनेच दूध भुकटी निर्मितीसाठी प्रतिलीटर तीन रुपये तर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णयही झाला आहे. त्यांना अजूनही काही फायदे मिळण्याची शक्यता असून दुधाला प्रतिलिटरमागे १२ रुपये वाढ होऊ शकते. असे असताना उत्पादकांना केवळ तीन रुपये वाढ देतात. ही उत्पादकांची फसवणुक आहे. जे दूध भुकटी करत नाहीत, त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दरवाढ होणार नाही. त्यासाठी सरकारनेच प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे किंवा सरसकट पाच रुपये दरवाढ द्यावी. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. 

दूध उत्पादकांना प्रति लिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च येतो. पण दुधाला निम्मीच किंमत मिळते. जो व्यवसाय परवडत नाही तो करायचा नाही, अशी भूमिका आहे. त्यामुळे दूध विक्री न करण्याचा निर्णय दूध उत्पादकांनी घेतला आहे. आंदोलनाचा निर्णय संघटनेचा नसून राज्यभरातील उत्पादकांशी चर्चा करूनच घेतला आहे.  दूध विकायचे की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना कोणीही रोखु शकत नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.तर कायदा हातात घेऊ...शेतकऱ्यांना दूध देण्याची सक्ती केल्यास संघटनेकडून कायदा हातात घेऊन संरक्षण दिले जाईल. संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन, धरपकड करून आंदोलन दडपले जाणार नाही. ते अधिक तीव्र होईल. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा आपले काम करेल, असे म्हटले असले तरी त्यांना शेतकरी कसा प्रतिकार करतात ते रात्री बारानंतर कळेल, असे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीmilkदूधnewsबातम्या