शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव स्थिर, बटाट्याची आवक स्थिर, भावात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव स्थिर राहिले. ...

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव स्थिर राहिले. तळेगाव बटाट्याची आवक स्थिर राहून भावात वाढ झाली. तरकारी व जनावरांचा बाजार सुरू झाला आहे. भुईमूग शेंगांची आवक घटल्याने बाजारभाव वाढले, तर लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा, दोडका, गाजर या फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशी कमी झाल्याने बाजारभाव वधारले.

पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू भाजीची आवक घटल्याने भावात वाढ झाली. जनावरांच्या बाजारात बैल,जर्शी गाय, म्हैस व शेळ्यामेंढ्यांच्या संख्येत संख्येत वाढ झाली.एकूण उलाढाल २ कोटी ३० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ११०० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत १०० क्विंटलने वाढूनही भाव स्थिर राहिले. कांद्याचे बाजारभाव १,८०० स्थिरावले. तळेगाव बटाट्याची एकूण १,२०० आवक क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहूनही बाजारभावात १०० रुपयांची वाढ झाली.

बटाट्याचा बाजारभाव १,७०० रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. लसणाचा ९,००० रुपये बाजारभाव मिळाला.भुईमूग शेंगांची ६ क्विंटलची आवक झाल्याने भाव ६,००० रुपये मिळाला.

चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १४७ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव :

कांदा - एकूण आवक - १,१०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,८०० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १,२०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,७०० रुपये, भाव क्रमांक २. १,४०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.

फळभाज्या -

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - १४० पेट्या ( ५०० ते १,००० रू. ). कोबी - १४७ पोती ( ४०० ते ८०० रू. ). फ्लॉवर - १२१ पोती ( ५०० ते १,५०० रू.),वांगी - २. पोती ( ३,००० ते ५,००० रू.). भेंडी - ४३ पोती ( २,००० ते ३,००० रू.),दोडका - १. पोती ( ४,००० ते ६,००० रू.). कारली - ३. डाग ( २,००० ते ४,००० रू.). दुधीभोपळा - २. पोती ( ५०० ते १,५०० रू.),काकडी - ६० पोती ( ५०० ते १,५०० रू.). फरशी - ७ पोती ( ४,००० ते ६,००० रू.). वालवड - ९ पोती ( ४,००० ते ६,००० रू.). गवार - २. पोती ( २,००० ते ४,००० रू.). ढोबळी मिरची - ३. डाग ( २,५०० ते ३,५०० रू.). चवळी - ७ पोती ( २,५००) ते ३,५०० रू. ). वाटाणा - २. पोती ( ६,००० ते ८,००० रू. ). शेवगा - १. पोती ( ४,००० ते ६,००० रू. ). गाजर - २. पोती ( १,००० ते २,००० रू.).

पालेभाज्या –

राजगुररुगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ४२ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला १,५०० ते २,४०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची ६० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ५०० ते १,४०० रुपये एवढा भाव मिळाला.शेपूची १२,००० जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते १,१५० रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रति शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण ४ हजार ६०० जुड्या ( १,००० ते २,००० रुपये ). कोथिंबीर - एकूण १. हजार ५४० जुड्या ( ७०० ते १,५०० रुपये ). शेपू - एकुण ३ हजार ४०० जुड्या ( ४०० ते ८०० रुपये ). पालक - एकूण २ हजार ४० जुड्या ( ४०० ते ६०० रुपये ).

जनावरे -

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४५ जर्शी गाईंपैकी २. गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ६,५००० रुपये ). १६७ बैलांपैकी ११२ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,५००० रुपये ). १५७ म्हशींपैकी ११२ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ७,०००० रुपये ). शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८२४० शेळ्या - मेंढ्यापैकी ७४९० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना २,००० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.

चाकण येथील जनावरांचा बाजार.