शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक ५० हजार स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 13:39 IST

अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची केली मागणी..

बारामती : अटकपूर्व जामीन प्रकरणात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहेत. बाळासाहेब जाधव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.त्याच्यासोबत पोलीस शिपाई अजिंक्य कदम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि. १२) रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब भीमराव जाधव (वय ५४, मूळ रा. पंढरपूर) व अजिंक्य लहू कदम यांनी ही रक्कम स्विकारली.तक्रारदाराच्या भावाविरोधात तालुका पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी बाळासाहेब जाधव व अजिंक्य कदम यांनी केली होती. यातील ५०  हजारांची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना रंगेहाथ अटक केली. बारामतीतील नेवसे रस्त्यावर हॉटेल ओमसमोर पैसे स्विकारताना त्यांना पकडण्यात आले. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, उपअधीक्षक श्रीहरीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक ज्योती पाटील, सुनील क्षीरसागर यांच्यासह पोलिस कर्मचारी दीपक टिळेकर व गणेश भापकर यांनी ही कारवाई केली.  एसीबीने कारवाई केलेल्या बाळासाहेब जाधव यांची मागील आठवड्यातच जेजुरी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. शनिवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. परंतु पैशाची हाव कायम राहिल्याने ते एसीबीच्या जाळ्यात अडकले.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक