शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसेस उपमुख्यमंत्री’ बारामतीत लावणार एक लाख झाडं; मिशन 'मिलियन ट्री' उपक्रमाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 20:29 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुका व शहर हरित व सुंदर असावे, अशी संकल्पना आहे

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील बारामती शहर हरीत आणि सुंदर बनविण्यासाठी ‘मिसेस उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेले एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती शहर व तालुक्यात एक लाख झाडे लावली जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुका व शहर हरित व सुंदर असावे, अशी संकल्पना आहे.त्यातुन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा हा या उपक्रमामागे असणारा उद्देश आहे.शहरातील भिगवण रस्त्यावर बारामती सहकारी बँकेनजिक सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मिशन मिलियन ट्री या उपक्रमाची नुकतीच सुरूवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव आदी उपस्थित होते.

केपजेमिनी व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यू या संस्थांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. बारामती तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तसेच बारामती नगरपालिकेचे जुने गावठाण व वाढीव हद्दीसह, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवरही या झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. 

पवार म्हणाल्या, या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बहुसंख्य ठिकाणी खड्डे घेण्याचे काम पूर्णत्वास गेले  आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये झाडे लावण्याचेही काम केले जाणार आहे.  बारामती पंचक्रोशीमध्ये प्रथमच एकाच वेळह मोठ्या संख्येने वृक्षारोपणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला  आहे. यामध्ये बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांसह, सेवाभावी संस्था व संघटनांचेही सहकार्य एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियास आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. ही झाडे लावताना अजित पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक हवामानामध्ये चांगली वाढ होतील .ज्या झाडांवर पक्षी वास्तव्य करु शकतील अशीच झाडे वृक्षारोपणासाठी निवडली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

या वृक्षारोपणादरम्यान पिंपळ, करंज, वड, काशिद, अर्जुन, ताम्हण, कांचन, शिसम, सीताफळ, जांभूळ, चिंच, आंबा आदी झाडे लावली जातील. ९८ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जवळपास ४७ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागासह वनविभागाच्या हद्दीतही ४५ हजार झाडे तर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत आठ हजार झाडे लावण्याचे नियोजन झालेले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार