शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच कोरोना संकट होतेय दिवसेंदिवस गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 21:01 IST

बारामतीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे...

बारामती : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्णक्षमतेने भरलेली रुग्णालये, रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी नातेवाईकांची घालमेल आणि आपल्याला उपचार मिळणार का या शंकेने हतबल झालेले रुग्ण ही परिस्थिती आहे.

बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णालय प्रशासन आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णालयाच्या हॉल,  प्रवेशद्वाराच्या समोरील प्रतीक्षा कक्ष, आदी ठिकाणी ६० बेड तयार करून कोरोना रुग्णांना दिलासा दिला. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील आजच्या प्रकारामुळे बारामतीतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या मुख्य उद्देशाने बारामतीत एक शासकीय मेडिकल कॉलेज, तीन नटराज असे चार कोविड केअर सेंटर, रुई आणि सिल्व्हर ज्युबिली रुगालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तर खासगी ‘बारामती हॉस्पिटल’ प्रशासनाने अधिग्रहीत केलेले  डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र बारामतीत १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने बेडचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह  उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण यांच्या टीमने तातडीने हालचाली करुन साठ बेडस, साठ बेडशीट, गाद्या यांची उपलब्धता करुन देत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात तात्पुरता पोर्चंमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे.

बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक जण सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. आज रुग्णालयातील सर्वच बेड रुग्णांनी व्यापलेले असताना अचानक जवळपास साठ रुग्ण उपचारासाठी विनंती करत असल्याने वैद्यकीय प्रशासनाची कोंडी झाली होती. ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही मात्र ज्यांना रेमडिसेव्हर इंजेक्शनची गरज आहे, अशा रुग्णांना कसेही करुन तात्पुरती व्यवस्था उभारुन सामावून घेण्याचा निर्णय डॉ. सदानंद काळे, किरण गुजर व सहकाऱ्यांनी घेतला असल्याने रुग्णांना उपचार मिळाले आहे.

------

गृहविलगीकरणास परवानगी द्यावी...

रुग्णांची वाढती संख्या आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे. गृहविलगीकरणास परवानगी देण्याची गरज आहे. संस्थात्मक क्वारंटाईन नको अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

----------रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे होते, त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. -  डॉ. सदानंद काळे, सिल्व्हर वैद्यकीय अधिक्षक-----------------

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलAjit Pawarअजित पवारCorona vaccineकोरोनाची लसSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे