शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार, अजित पवारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 1:29 PM

कोळशाच्या टंचाईवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भाष्य केलं आहे.

पुणे- वीज टंचाईमुळे राज्यात १,४०० ते १,५०० मेगावॅट विजेचे भारनियमन करावे लागणार असून, नागरिकांनी ते सहन करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. अदानी वीज कंपनीने महावितरणचा वीजपुरवठा बंद केल्याने राज्यावर वीज भारनियमनाचे संकट ओढवले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्राचे कोळशाचे नियोजन फसले आहे. शिवाय कोळसा मंत्रालयाला रेल्वे मंत्रालयाचे सहकार्य नाही. त्यामुळे भाजपने खुशाल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असतानादेखील भारनियमन होते, असा आरोपही नितीन राऊत यांनी यावेळी केला.

कोळशाच्या टंचाईवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भाष्य केलं आहे. देशपातळीवर कोळशाची टंचाई आहे. विविध राज्यांत हवा तेवढा कोळशाचा पुरवठा होत नाहीय. त्यामुळे परदेशातूनही कोळसा आयात करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच छत्तीसगडमधून कोळशाची खाणच घेण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. 

दरम्यान, वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. या परिस्थितीत सर्वांनीच वीज बचत करायला हवी. विजेची उधळपट्टी थांबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. आवश्यक वीज उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी वीज कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे नियोजन करावे. त्यासाठीच्या लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

...तर भारनियमन होणार नाही-

वीज खरेदी कराराचा भंग केल्यामुळे अदानी कंपनीला नोटीस पाठवण्यात येईल. जेएसडब्ल्यूकडून १०० मेगावॅट वीज मिळायची. परंतु त्यांचा प्रकल्प बंद झाल्याने तीही वीज मिळत नाही. सीजीपीएलसोबत जो करार होता, त्यानुसार ही मागणी केली होती, ७६० मेगावॅट वीज मागितली आहे. त्यांनी ६३० मेगावॅट वीज दिली. वीज व कोळसा मिळत नसल्यामुळे आम्हाला भारनियमन करावे लागत आहे. महावितरणला १,५०० मेगावॅट वीज मिळाली तर भारनियमन होणार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :electricityवीजCoal Shortageकोळसा संकटmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार