शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 06:16 IST

मोजक्या वैष्णवांची उपस्थिती; पैठणला नाथमहाराजांच्या पालखीचेही प्रस्थान

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३५ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी दुपारी मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत साधेपणाने परंतु विधीवत झाले. कोरोनामुळे आषाढी पायी सोहळा रद्द झाला असला तरी ५० भाविकांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे प्रस्थान सोहळ्यास जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यापार्श्वभूमीवर देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. देहूत येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बंद करून बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी केली होती.

दुपारी अडीचच्या सुमारास संस्थानचे अध्यक्ष मधुकरमहाराज मोरे यांच्या हस्ते प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर पताका, तर केवळ एकमेव महिला डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करीत होते. परंपरेप्रमाणे सर्व विधी पार पडल्यानंतर सोहळा सायंकाळी भजनी मंडपात विसावला. सर्वांनी मास्क लावला होता.पैठण (जि. औरंगाबाद) येथे नाथमहाराजांच्या पालखीने मोजक्या मानकऱ्यांसह नाथ मंदिरातून प्रस्थान केले. १७ दिवस पालखी समाधी मंदिरात मुक्कामी राहील. त्यानंतर शासकीय निर्देशानुसार पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.माऊलींच्या सोहळ््याचे आज प्रस्थानसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा शनिवारी श्री क्षेत्र आळंदी येथे होणार आहे. पालखी १७ दिवस आजोळ घरीच राहणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला माउलींच्या चल पादुका हेलिकॉप्टर अथवा बसने पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी