शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा अतिक्रमण विभाग गॅस कंपन्यांवर मेहेरबान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:19 IST

कारवाईत जप्त केलेली सिलिंडर कंपन्यांना दिली ‘मोफत’

लक्ष्मण मोरे 

पुणे : महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते, पदपथांवर केलेल्या अतिक्रमण कारवाईत जप्त केलेली तब्बल दीड हजार गॅस सिलिंडर गॅस कंपन्यांना मोफत देण्यात आली आहेत. एकीकडे कारवाई केलेल्यांकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल करून त्यांना त्यांचे सिलिंडर परत केले जाते. मात्र दुसरीकडे, कंपन्यांना फुकटात हे सिलिंडर देण्यात येत असल्याने पालिकेचे गेल्या वर्षभरात ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यामागील गौडबंगाल शोधण्याची मागणी करण्यात येत आहे.

पालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये १ आॅक्टोबर २०१७ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत २,००३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आली होती. ४८८ कारवाई केलेल्या व्यावसायिकांनी त्यांची सिलिंडर सोडवून नेली. तर, १ हजार ५१५ सिलिंडर पालिकेकडे पडून होती. ही सिलिंडर नेण्यासाठी कोणीही आले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. ज्यांनी ही सिलिंडर सोडवून नेली त्यांच्याकडून सध्याच्या धोरणानुसार ‘रिमुव्हल चार्जेस’पोटी प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे १४ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.मात्र, दुसरीकडे कंपन्यांना उरलेली सर्व सिलिंडर मोफत देण्यात आली. कंपन्यांना पत्र देत असताना महापालिकेने त्यामध्ये या सिलिंडरवर कोणत्याही स्वरूपाची एफआयआर किंवा गुन्हा दाखल नसल्याचे म्हटले आहे. अतिक्रमण विभागाकडून सर्व क्षेत्रीय सहायक आयुक्तांना या संदर्भात पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रात, जप्त केलेली सिलिंडर आणि शेगड्या परत न नेता नवीन सिलिंडर आणि शेगड्या विकत घेऊन पुन्हा तेथे व्यवसाय थाटला जात असल्याने कारवाईचा उद्देश सफल होत नसल्याचे म्हटले आहे.उच्च न्यायालयाने पदपथावर खाद्यपदार्थ शिजविणाऱ्या व्यावसायिकांवर भादंवि २८५ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र, महापालिकेने असे गुन्हेच दाखल केलेले नाहीत.अनेक कंपन्यांना पत्रहातावरचे पोट असलेल्या कष्टकºयांना दंड लावणाºया महापालिकेने गोगॅस, आॅरेंज गॅस, टोटल गॅस, पूर्ती गॅस, पुष्पा गॅस, पुरे गॅस या सर्वसामान्यांनी कधीही नाव न ऐकलेल्या कंपन्यांना जप्त सिलिंडर घेऊन जाण्यासाठी पत्र दिले. यासोबतच रिलायन्स गॅस व्यवस्थापनालाही याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.या सर्व कंपन्यांना आधी पत्र देण्यात आले असून त्यानंतर एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल या कंपन्यांना पत्र देण्यात आले आहे. कोणत्या कंपनीला किती सिलिंडर दिले, याबाबतची आकडेवारीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.अनधिकृत पथारी व्यावसायिकांकडून जप्त केलेल्या सिलिंडरची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था महापालिकेकडे नाही. गॅस कंपन्यांनाही अशा प्रकारे अनधिकृत व्यावसायिकांना सिलिंडर दिल्यास कंपन्या आणि डीलरवर गुन्हे दाखल करू, असे सांगितले आहे. अनधिकृत व्यावसायिकांकडून दंड घेतला जात असला तरी एचपी आणि भारत गॅस या कंपन्यांनाच मोफत सिलिंडर दिले जातात. त्या शासकीय कंपन्या असल्याने त्यांना मोफत सिलिंडर देतात.- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभागमहापालिका वर्षाला साधारण दोन ते अडीच हजार सिलिंडर अनधिकृत पथारी व्यावसायिकांकडून जप्त करते. जी सिलिंडर दंड भरून परत नेली जात नाहीत ती कंपन्यांना मोफत दिली जातात. गरीब आणि हातावरचे पोट असलेल्यांना तीन हजारांचा दंड करून लुटले जात आहे. ४८८ पथारीधारकांकडून वर्षभरात १४ लाख ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, याच दराने १५१५ सिलिंडर मोफत देऊन पालिकेने ४५ लाख ४५ हजार रुपयांवर पाणी सोडले आहे. गॅस कंपन्यांवर महापालिका मेहेरबान झाली आहे.- आशिष माने,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Puneपुणे