शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कर्णबधिरांच्या उच्च शिक्षणाला ‘तांत्रिक’ नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:58 IST

अर्जात तांत्रिक चूक दाखवित उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कर्णबधिरांसाठीच्या महाविद्यालयाची मान्यता रोखली आहे. विशेष म्हणजे, त्रुटींची पूर्तता करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, संबंधित संस्थेला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आहे.

- विशाल शिर्केपुणे - अर्जात तांत्रिक चूक दाखवित उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कर्णबधिरांसाठीच्या महाविद्यालयाची मान्यता रोखली आहे. विशेष म्हणजे, त्रुटींची पूर्तता करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, संबंधित संस्थेला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले आहे.गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षण विभागाने नवीन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कर्णबधिर महाविद्यालय उभारण्याचादेखील समावेश आहे. राज्यात बारावीनंतर कर्णबधिर विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण देण्याची कोणतीच सुविधा सध्या उपलब्ध नाही. कर्णबधिर व्यक्तींना शिकविण्यासाठी सांकेतिक भाषा (साईन लँग्वेज) अवगत असणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांची आवश्यकता असते. त्या पार्श्वभूमीवर धानोरीतील श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्ट संचालित सी. आर. रंगनाथन कर्णबधिर कला व वाणिज्य महाविद्यालाने कर्णबधिर-मूकबधिर विद्यालयासाठी अर्ज केला होता. त्यांना मानवविज्ञान-बी. ए. आणि वाणिज्य व व्यवस्थापन (बी.कॉम) शाखेसाठी अर्ज केला होता.चालू वर्षांच्या अंदाजपत्रकाची प्रत जोडली नाही, पाच वर्षे कालावधीच्या मुदत ठेवीची प्रत जोडली नाही, अशा सहा त्रुटी काढल्या होत्या. संबंधित संस्थेने पुणे विद्यापीठाच्या मार्फत या त्रुटींची पूर्तता केली. विद्यापीठानेदेखील शिक्षण खात्याकडे संबंधित संस्थेची बी.ए. आणि बी. कॉम या शाखेसाठी शिफारस केली; मात्र शिक्षण विभागाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहीर केलेल्या यादीत संस्थेचे नावच नाही.संस्थेने मुदत ठेवीची रक्कम ५ वर्षांऐवजी २ वर्षे ठेवली असल्याचे उत्तर त्यात दिले आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुदतठेवीची मुदत ही पुढे देखील वाढविता येते. आॅटो रिन्युअल नुसार ती ठेवण्यात आली आहे. नियमानुसार संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेशिवाय ही रक्कम काढण्याचा अधिकारच या संस्थेला नाही. असे असतानाही केवळ एका तांत्रिक कारणासाठी शिक्षण विभागाने त्यांना उच्च महाविद्यालयाचीपरवानगी नाकारली असल्याची माहिती श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व्ही. बी. पाटोळे यांनी दिली.भाई वैद्य यांनीही केली होती शासनाला शिफारसज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे २ एप्रिल रोजी नुकतेच निधन झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी संबंधित संस्थेला मान्यता मिळाली नसल्याचे समजल्यावर भार्इंनी १३ मार्च ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले होते. त्यात सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्टसारख्या महत्त्वाच्या महाविद्यालयाला केवळ शाब्दिक कारणासाठी मान्यता नाकारली. नोकरशाहीने शाब्दिक रचनेप्रमाणे मुदतठेवीची रक्कम ५ वर्षांसाठी न केल्याने मान्यता नाकारली आहे. विद्यापीठाने शिफारस केल्यानंतर मान्यता द्यायला हवी होती. हे पत्र आपण स्वत: तपासावे आणि आपल्या कार्यकालात कर्णबधिर महाविद्यालय सुरूव्हावे, असे या पत्रात म्हटले आहे....तर कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानफेब्रुवारी महिन्यात झालेल्या १२वीच्या परीक्षेत राज्यात १ हजार १३४ बहिरे आणि ११० मुके विद्यार्थी बसले होते. त्यात पुणे विभागात १८८ बहिरे आणि १९ मुके विद्यार्थी होते. धानोरीच्यासी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयात २०१५-१६मध्ये ३९, तर २०१६-१७ मध्ये ३४ विद्यार्थ्यांंनी १२वीचीपरीक्षा दिली होती. अनुक्रमे २८ आणि ३१ विद्यार्थीउत्तीर्ण झाले. या वर्षीच्या परीक्षेला ४७ विद्यार्थी बसले आहेत. उच्च शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिफारशीनंतरही शिक्षण विभागाने तांत्रिक कारणावर पदवी अभ्यासक्रमास नकार दिला आहे. पुणे विद्यापाठांतर्गत कर्णबधिर महाविद्यालयाचा हा एकमेव प्रस्ताव होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी ४ जून रोजी होणार आहे. त्या वेळी जरी अनुकूल निर्णय झाल्यास आमची अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी आहे.- व्ही. बी. पाटोळे, अध्यक्ष, श्री सद्गुरू साईबाबा सेवा ट्रस्ट1 राज्यात २०११च्या जनगणनेनुसार अंध, अस्थिव्यंग, बहिरे, मतिमंद, मानसिक आजार, बहुविकलांग असे विविध स्वरूपाचे अपंगत्व असणारे १६ लाख ९२ हजार २८५ पुरुष आणि २९ लाख ६३ हजार ३९२ स्त्रिया दिव्यांग आहेत.2अशा एकूण २९ लाख ६३ हजार ३९२ दिव्यांग व्यक्तींपैकी मुके असणाºया स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे ४ लाख ७३ हजार ६१० आणि बहिरे असणाºया स्त्री-पुरुषांचे प्रमाण ४ लाख ७३ हजार २७१ इतके आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकPuneपुणे