शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: राज्यात डेंग्यूचा फास हाेताेय ढिला; रुग्ण आणि मृत्यूमध्ये घट

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: June 9, 2023 15:22 IST

कीटकजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सूरू आहे...

पुणे : एडिस इजिप्टाय डासांपासून पसरणारा ‘डेंग्यू’ या विषाणुजन्य आजाराचे रुग्ण आणि मृत्यूदेखील गेल्या दाेन ते अडीच वर्षांपासून राज्यात सातत्याने घटत आहेत. यावरून राज्यात डेंग्यूचा फास ढिला हाेत असल्याची सकारात्मक बाब दिसून येत आहे.

कीटकजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सूरू आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या व मृत्यू याची नाेंद व त्याबाबत उपाययाेजना केल्या जातात. त्यानुसार सन २०२१ मध्ये राज्यात १२ हजार ७२० रुग्ण ४२ मृत्यू झाले हाेते. तर, सन २०२२ मध्ये ८ हजार ५७८ रुग्ण व २७ मृत्यू झाले हाेते. यावर्षी राज्यात १२३७ डेंग्यूचे रुग्णांचे निदान झाले असून एकाही रुग्णाचा अदयाप मृत्यू झालेला नाही. डेंग्यू रुग्णांचा हा उतरता ग्राफ सार्वजनिक आराेग्य विभागाच्या दृष्टीने दिलासादायक ठरत आहे, अशी माहीती साथराेग विभागाच्या सहसंचालक डाॅ. बबिता कमलापुरकर यांनी दिली.

कसा हाेताे प्रसार?डेंग्यू रोगाचा प्रसार डेंग्यू विषाणु दुषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला हा डेंग्यू विषाणू दुषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसात डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू तापाचे ३ प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात डेंग्यू ताप हा फल्यू सारखा आजार आहे. दुस-या प्रकारात रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप तर तिस-या प्रकारात डेंग्यू शॉक सिड्रोंम हा तीव्र प्रकारचा रोग आहे. यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते.

डेंग्यू तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी करण्यात येणा-या उपाययोजना

  • ताप रुग्ण सर्वेक्षण, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांचेमार्फत केले जाते.
  • संशयित ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन एन. आय. व्ही. पुणे / राज्यातील निवडक ४३ सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविले जातात.
  • एडिस एजिप्ताय डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी एन. आय. व्ही. पुणे कडे तपासणीसाठी पाठविले जातात.
  • गरजेनुसार उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.
  • घरातील व परिसरातील डासअळ्या आढळून आलेले पाण्याच्या साठयांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. कायम पाणीसाठयात गप्पीमासे सोडले जातात.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdengueडेंग्यू