शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

डेंगीने पुन्हा काढले डोके वर

By admin | Updated: November 11, 2015 01:51 IST

दिवाळीच्या ऐन सणाच्या दिवसांत शहरातील अनेक भागात डेंगीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने पुणेकरांची दिवाळी काही प्रमाणात आरोग्यदायी नसल्याचे चित्र आहे.

पुणे : दिवाळीच्या ऐन सणाच्या दिवसांत शहरातील अनेक भागात डेंगीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने पुणेकरांची दिवाळी काही प्रमाणात आरोग्यदायी नसल्याचे चित्र आहे. शहरात मागील अनेक दिवसांपासून असलेली पाणीकपात लागू झाली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करत आहेत. डेंगीचे डास हे स्वच्छ पाण्यातच वाढत असल्याने या डासांच्या संख्येत वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सणांमुळे पाहुण्यांचे येण्याचे प्रमाण किंवा इतर अनेक कारणांनी नागरिक जमेल त्या पद्धतीने पाणी साठवून ठेवत आहेत. एडिस इजिप्ति या डेंगीच्या डासांची पाण्यावर वाढ होऊन त्यांच्या अंड्यांचे प्रमाणही वाढते. तसेच डेंगी झालेल्या एखाद्या व्यक्तीला हा डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तरीही या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा डेंगीने डोके वर काढले असून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांच्या लखलखाटात जीवन आरोग्यदायी, सुखकर व्हावे, अशी प्रार्थना करत असताना अनेकांची कुटुंबांची दिवाळी मात्र आजारपणातच जात आहे. डेंगी सुरुवातीला लक्षात येत नसल्याने उपचार होण्यास उशीर होतो. विविध विषाणूंची वाढ होण्यासाठी आताचे वातावरण अतिशय पोषक आहे. त्यातच नागरिक आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेत नसल्याने अशा प्रकारच्या साथीच्या आजारांत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी, ताप यांसारखी कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरिीत डॉक्टरांकडे जावे, असे डॉ. अच्युत जोशी म्हणाले. डेंगीमध्ये रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या कमी होते व त्यामुळे रुग्ण घाबरुन जातात. मात्र औषधांनी आणि ठराविक दिवसांत हे प्लेटलेटचे प्रमाण पूर्ववत येते. त्यामुळे रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याची घाई करु नये, असे डॉ. अविनाश भांडवे यांनी सांगितले.पहिल्या प्रकारात ताप येतो आणि तो ३ ते ४ दिवसांत जातो. त्यामुळे या प्रकारात डेंगी झाला, हे लक्षातही येत नाही. यामध्ये रुग्णाची परिस्थिती गंभीर नसते. केवळ थकवा, अशक्तपणा जाणवतो.दुसऱ्या प्रकारात ताप येऊन अंगदुखी, अंगावर पुरळ येते, पायावर सूज येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. साधारणपणे ४ दिवस ताप राहून नंतर तो उतरतो. तसेच ४ ते ६ दिवसात एकदम कमी झालेल्या प्लेटलेट कालांतराने वाढतात. यामध्ये पॅरोसिटमॉल हे औैषध देणे तसेच शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि लिंबू सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. यामध्ये शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते व बी.पी. ही कमी होतो. एखाद्या रुग्णाला एकदा डेंगी होऊन गेला असेल आणि पुन्हा झाला तर त्याच्या जवळपास सर्व अवयवांतून अति रक्तस्त्राव होतो. हृदय, किडनी, यकृत यांच्यातून रक्तस्त्राव झाल्याने रुग्णाच्या जीवाला धोका असतो. यामध्ये एकामागे एक अवयव निकामी होतात व रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे दुसऱ्यांदा डेंगी झाल्यास जास्त काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये रुग्णाला सलाईनव्दारे तापाची आणि शक्तीवर्धक औैषधे दिली जातात.हा डेंगीतील शेवटचा प्रकार असून यामध्ये अतिशय वेगाने पाण्याची पातळी खालावते. तसेच रक्तदाबाची नोंदच होत नाही. यामध्ये रुग्णाला सलाईनमधून रक्त व रक्तदाब वाढण्यासाठी औैषधे दिली जातात. डेंग्यूच्या कोणत्याही प्रकारासाठी विशिष्ट औैषधे नसतात. तसेच रुग्णाच्या लक्षणांनूसार त्याचे निदान व उपचार केले जातात. यामध्ये प्लेटलेटसचे प्रमाण ५० हजारांहून कमी झाल्यास रुग्ण नियंत्रणाखाली राहण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. यामध्ये प्लेटलेटस १० हजारांहून कमी झाल्या तरच त्या बाहेरुन द्याव्या लागतात. अफेरिसिस या मशिनव्दारे त्या रक्ताप्रमाणेच दिल्या जातात. परंतु गरज नसताना प्लेटलेटस दिल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.डेंगीच्या रुग्णांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. डेंगीच्या डासांच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. तसेच पाणीकपातीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करीत आहेत. स्वच्छ पाण्यात या डासांची पैदास होत असल्याने अशा प्रकारचा पाणीसाठी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर योग्य ती काळजी घ्यावी. तरीही आता असलेली रुग्णांची ही संख्या मागील वर्षीपेक्षा बरीच कमी असून महापालिकेकडून डेंगी निवारणाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. - डॉ. एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका