शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फलटण ते लोणंद मार्गावर धावणार डेमु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:24 IST

लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते.

ठळक मुद्देफलटण-बारामती मार्गाची प्रतीक्षाप्रवाशांसाठी दि. ११ सप्टेंबर रोजी फलटण येथे या गाडीचे लोकार्पण होणार फलटण व इतर दोन स्थानकांतून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था

पुणे : मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या लोणंद ते फलटण रेल्वेमार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या मार्गावर दि. १२ सप्टेंबरपासून डेमु सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते. अनेक अडचणींवर मात करत काही महिन्यांपूर्वी या मार्गावरून रेल्वेगाडी सुरू करण्यात मान्यता मिळाली. त्यानंतर काही दिवसांपासून गाडीची चाचणीही घेण्यात आली. आता प्रत्यक्ष प्रवाशांसाठी दि. ११ सप्टेंबर रोजी फलटण येथे या गाडीचे लोकार्पण होणार आहे. तर नियमित सेवा दि. १२ सप्टेंबरपासून धावणार आहे. ही सेवा रविवार सोडून इतर सर्व दिवशी धावणार आहे. लोणंदहून ही गाडी सकाळी ७.२० वाजता सुटून ८.५० वाजता फलटण स्थानकात पोहचेल. तर फलटण स्थानकातून सकाळी ९.३० वाजता सुटून ११ वाजता लोणंदमध्ये दाखल होईल. दुसरी डेमु सकाळी ११.३५ वाजता लोणंद स्थानकातून सुटून दुपारी १.०५ वाजता फलटणमध्ये पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात दुपारी १.४५ वाजता सुटून ३.१५ वाजता लोणंद स्थानकात येईल. ही गाडी तरडगाव व सुरवडी स्थानकातही थांबेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तिकीटाची व्यवस्था केवळ लोणंद स्थानकात असणार आहे. फलटण व इतर दोन स्थानकांतून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गाडीमध्ये रेल्वे गार्डकडे तिकीटे उपलब्ध असतील. ही गाडी सुरू झाल्याने फलटण व लोणंददरम्यानच्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या मार्गावर डेमु धावणार असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने काळजी घ्यावी. तसेच जनावरांनाही रेल्वेमार्गावर दुर ठेवावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

....

मागील अनेक वर्षांपासून बारामती ते लोणंद या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ फलटण ते लोणंद दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. फलटण ते बारामती मार्गासाठी जमीन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे हा मार्ग रखडला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास परिसरातील नागरिकांसह रेल्वेलाही मोठा फायदा होणार आहे. दक्षिणेत ये-जा करणाऱ्या गाड्यांना सध्या पुणे स्थानकातून दौंडकडे जावे लागते. लोणंद-बारामती मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याकडे येण्याचा वळसा वाचणार आहे. या गाड्या थेट बारामतीवरून दौंडमार्गे पुढे जाऊ शकणार आहेत. त्यामुळे पुणे स्थानकावरील मोठा ताणही कमी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीticketतिकिट