पुणो : भूत उतरविण्यामागचा विधी, हवेत हात फिरवून दागिने काढणो, पेटता कापूर तोंडात टाकणो या व अशा अनेक गोष्टी पुणोकरांनी डोळय़ांदेखत पाहिल्या. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे तथाकथित चमत्कार अंधश्रद्धा निमरूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. श्याम मानव आजपासून दाखविणार असून, बाबा-बुवांचा, अनिष्ट प्रथांचा भंडाफोड करणार आहेत.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग, तसेच समाज कल्याण आयुक्तालयातर्फे जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (पीआयएमसी)तर्फे जादूटोणा विरोधी कायद्याच्या 12 कलमांची माहिती सर्व जिल्ह्यांमध्ये दिली जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ सोमवारी पुण्यातून झाला. आगामी 5 वर्षामध्ये प्रत्येक नागरिकास या कायद्याची माहिती व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रा. मानव पीआयएमसीचे सहअध्यक्ष आहेत.
विभागीय आयुक्त विकास देशमुख यांच्या भाषणाने या उपक्रमाचे उद्घाटन झाले. समाजकल्याण आयुक्त रणजित देओल, पीआयएमसीचे सदस्य एस. बी. भंडारे, एस. एम. कांडलकर, नरेश झुरमुरे, रवींद्र कदम पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निमरूलन समितीचे अध्यक्ष मधुकर कांबळे, तसेच प्रवीण गांगुर्डे, क्षितिज श्याम व्यासपीठावर होते.
जीवनाच्या सर्व क्षेत्रंमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो, तेव्हा जातीविषयाच्या, ियांचा दर्जा कमी असण्याच्या अंधश्रद्धांपासून सर्वच अंधश्रद्धा गळून पडतात, असे मानव यांनी सांगितले. भूत उतरविण्याच्या बहाण्याने केला जाणारा छळ, आर्थिक प्राप्तीसाठी केले जाणारे चमत्कार, अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्यासाठी केल्या जाणा:या अघोरी प्रथा, गुप्तधन, जलस्नेतांच्या शोधापोटी केला जाणारा जादूटोणा, अ¨तंद्रीय शक्ती असल्याचे सांगून धमकाविणो, चेटूक, जारणमारण, करणी, मंत्रंच्या साह्याने भूत पिशाच्चंना आवाहन, विषारी प्राण्यांच्या दंशानंतर गंडेदोरे, मंत्र यांचा अवलंब, लिंगबदल करण्याचा दावा या सर्व गोष्टी कायद्यानुसार आता गुन्हा ठरणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या गुन्हय़ांसाठी असलेली शिक्षा काय आहे, हेही सविस्तर नमूद केले.
अशिक्षीतांसह सुशिक्षितही अनिष्ट प्रथांना बळी पडतात, त्यामुळे हा कायदा समजावून घेतला पाहिजे, असे आवाहन देशमुख यांनी केले.
टोमॅटोबाबाचा रस म्हणजे मनावरचा उपाय
दौंडमधील टोमॅटोबाबा या विषयावरही श्याम मानव यांनी प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, की गर्भ¨लंग बदलून देण्यासारखे, दुर्धर आजार बरे करण्यासारखे दावे टोमॅटोबाबा करीत असेल, तर त्याच्यावर केंद्र शासनाच्या मॅजिक अँड रेमेडीज अॅक्टनुसार कारवाई होऊ शकेल. जादूटोणाविरोधी कायद्यात त्याचे कृत्य बसत नाही. या टोमॅटोच्या रसामुळे आजार बरा होण्यामागे काही चमत्कार नाही. आजारी माणसाच्या मन आणि शरीरातच रोग बरा करण्याची ताकद असते. यामुळे आपण बरे होऊ, असा विश्वास बसला की रोग बरा होतो, हे मानसशा त्यामागे आहे, असे प्रा.मानव यांनी नमूद केले.