शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात टँकरची मागणी घटणार?, जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणीपातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:09 IST

मागील वर्षी बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने चांगली साथ दिली. या पावसामुळे जिरायती भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाणीसाठा चांगला झाला होता. त्यामुळे येथील विहिरींच्या भूजलपातळीत वाढ झाली.

बारामती : मागील वर्षी बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने चांगली साथ दिली. या पावसामुळे जिरायती भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाणीसाठा चांगला झाला होता. त्यामुळे येथील विहिरींच्या भूजलपातळीत वाढ झाली. सध्या देखील येथील विहिरींची पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात बारामतीच्या जिरायती भागातून टँकरची मागणी घटण्याची शक्यता आहे.बारामती तालुक्यात २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ८०४ पैकी ६९९ कामे पूर्ण करण्यात आली. जिरायती भागातील ओढे, नाले, खोलीकरणाबरोबरच माती बंधारे, सिमेंट बंधारे व बांधबंदिस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. या पूर्ण झालेल्या कामांना मागील वर्षी वरुणराजाचा देखील आशीर्वाद लाभला. परतीच्या पावसाने जिरायती भागासह संपूर्ण तालुका व्यापला. परिणामी जलयुक्तच्या कामांमुळे ५ हजार ८६३ टीसीएम पाणीसाठी होण्यास मदत झाली.एरवी दिवाळी संपताच जिरायती भागातील जनतेवर पाणी-पाणी करण्याची वेळ येते. टँकरच्या मागण्यादेखील जोर धरू लागतात. संपूर्ण उन्हाळाच येथील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. मात्र यंदाच्या वर्षी मार्च महिनापर्यंत पंचायत समितीकडे फक्त उंडवडी कडेपठार येथून टँकर मागणीचा एकमेव प्रस्ताव आल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.>मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे पूर्ण झालेल्या कामांना परतीच्या पावसामुळे चांगला फायदा झाला. येथील शेती उत्पादनदेखील १५ टक्क्यांपर्यंत वाढले. जिरायती भागातील शेतकºयांनी जलसाक्षर होण्याची गरज आहे. कमी पाण्यावर येणाºया फळबागांकडे येथील शेतकरी वळाल्यास शेतकºयांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.- संतोषकुमार बरकडे, तालुका कृषी अधिकारी, बारामतीमात्र यंदा पुरेशा प्रमाणात विहिरींमध्ये पाणीसाठा असल्याने शेतकºयांनी चारापिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे येथील पशुधनास यंदाच्या उन्हाळ्यात सकस चारा मिळण्यास मदत होणार आहे. जलयुक्तच्या कामांमुळे जिरायती भागातील विहिरींच्या पाणीपातळीत सरासरी १.७२ मीटरने वाढ झाली आहे. त्याचा येथील२ हजार ६३८ हेक्टरला सिंचनासाठी फायदाझाला आहे.

टॅग्स :Puneपुणे