शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी; 'अशी' झाली अपहरणकर्त्या मुलाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 00:18 IST

बारामती तालुक्यातील घटना

बारामती : व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाखांची मागणी करीत पाहुणेवाडी(ता.बारामती)येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.मात्र, अपहरण झालेल्या युवकाला पोलीसांच्या भीतीने मोरगाव नजिक  अपहरणकर्त्यांनी  दुसºया दिवशी सोडुन दिले आहे. अपहरण झालेला युवक सुखरुप असुन त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

 बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसारमी अनमोल लालासाहेब परकाळे (वय २७, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (ता. २८ ) रात्री या अपहरण नाट्यास रात्री सव्वा नऊच्या सुमारास सुरुवात झाली.  कुत्रेबाहेर फिरविण्यासाठी अनमोल घराबाहेर गेला होता.यावेळी काही मिनिटात त्याचे वडील लालासाहेब दौलतराव परकाळे यांना त्यांच्या मुलाच्याच फोनवरुन फोन आला. तुमच्या मुलाने माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले आहेत, त्याचे व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मी सांगेन तेथे आणूनद्या . पोलिसांना सांगितल तर मुलाला विसरा, असा दमच संबंधित अपहरण कर्त्यांनी लालासाहेब यांना भरला.

त्यानंतर रात्री १०.१२ नंतर पुन्हा १०.१६ वाजेदरम्यान लालासाहेब यांना परत त्याचा फोन आला. त्यावेळी तो मला म्हणाला की,तुमचा फोन व्यस्त लागतोय तुम्ही कोणाशी चर्चा केली काय, तुम्ही पोलिसांना फोन लावता काय जर तुम्ही त्यांना फोन केला तर तुमच्या मुलाला विसरा, असा दम दिला. त्यावेळी लालासाहेब यांच्या पत्नी अनिता यांनी फोन घेवून मुलाकडे कसले पैसे आहेत,अशी विचारणा केली.त्यावर आमचा व्याजाचा व्यवसाय असुन तुमच्या मुलाने माझ्याकडुन पंधरा लाख रुपये व्याजाने घेतले आहे ते व्याजासह तीस लाख रुपये उद्या दुपारी ३ वाचे पर्यंत द्यायचे, नाहीतर तुमचा मुलगा तुम्ही विसरा असे म्हणुन फोन बंद केला.आमच्या मुलाचे बरे वाईट होईल  या भीतीने परकाळे दांपत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलिसात केलीच नाही.

 रविवारी दुपारी दोन वाजता अनमोल याच्याच फोनवरुन पैशांची सोय झाली का असा विचारणा करणारा फोन आला. लालासाहेब यांनी आपल्याकडे आता दोन लाख रुपये आहेत, असे त्याला सांगितल्यावर पूर्ण पैशांची सोय करा नाहीतर मुलाला विसरा, असा दम पुन्हा देण्यात आला.तासाभराने पुन्हा अपहरणकर्त्यांनी सहा लाख रुपये रोख व दोन कोरे चेक द्यावे लागतील, असे सांगितले. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरगाव रस्त्याने जेजुरीत पैसे घेऊन या, असा फोन आला. का-हाटी येथे असताना पुन्हा अपहरणकर्त्यांनी मोरगाव येथे लालासाहेबांना बोलावले. पुन्हा त्यांना नीरा रस्त्याने नीरेकडे या असा निरोप फोनवर अपहरणकर्त्यांनी दिला. मात्र लालासाहेबांना अपहरणकर्त्यांनी विचारणा केली की तुमच्या गाड्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत. काय,मात्र, पोलिसांचा व गाड्यांचा संबंध नाही असे सांगितल्यावर पुन्हा त्यांना मोरगावकडे येण्यास सांगितले. यावेळी पेट्रोलपंपावर थांबण्यास सांगितल्यावर पुन्हा नीरा बाजूकडे गाडी आणण्यास सांगितले गेले. गुळुंचे येथे असतानाच लालासाहेब यांना अनमोलचाच फोन आला की त्याला मोरगाव जेजुरी रस्त्यावरील श्रीसृष्टी धाब्याजवळ अपहरणकर्त्यांनी सोडले आहे. यावेळी अनमोल याने वडिलांना एक वॅगनर या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अनोळखी पाच जणांनी जबरदस्तीने बसवुन अपहरण केल्याचे सांगितले. दमदाटी करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे सांगितले. करुन पैश्याची मागणी केली. माझी वरील अनोळखी पाच इसमांविरुध्द तक्रार आहे.————————————————...पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात  लालासाहेब यांनी पोलिसांना कळवले नव्हते.मात्र, या अपहरणनाट्याची  माहिती समजल्याने पोलिसांनीही समांतर पाठलाग सुरु केला होता. अपहरणकर्त्यांनाही पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी अनमोलला रस्त्यात सोडून पळ काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्यासह अनेक पोलिस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. अनमोल सुखरुप परत आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.पोलिसांनी या पाचही अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीKidnappingअपहरणPoliceपोलिस